तिथी
|
आश्विन कृष्ण ७ (११:१०)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
पुष्य (२६:३४)
|
योग
|
साध्य (१४:२९)
|
करण
|
बव (११:१०), बालव (२२:१०)
|
कालाष्टमी
प्रत्येक महिन्यातील कृष्ण
अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल
पक्षातील अष्टमीला शिवपूजन निषिद्ध मानले जाते.
कराष्टमी
आश्विन महिन्यांतील वद्य
अष्टमी. या दिवशीं कुमारिका गंगोदकानें
भरलेला करा हातांत घेऊन देवीची पूजा करतात.
ही चाल काशीच्या बाजूस दृष्टीस पडते.
कराष्टमीपासून दिवाळीपर्यंतचे
दिवस - यांत एक एक दिवा दररोज जास्त लावण्याची पद्धत आहे.
दम्पत्यष्टमी
पुत्रप्राप्तीच्या इच्छॆने
स्त्री-पुरुषांना हे व्रत करता येते. हे व्रत करताना आश्विन कृष्ण अष्टमी दिवशी
दर्भाचे शिव-पार्वती तयार करून त्यांची पंचोपचार पूजा करावी. जवळच ब्राह्मणपूजन
करून त्यास दक्षिणा द्यावी. या व्रताने पुत्रप्राप्ती होते. हे व्रत
चंद्रोदयव्यापिनी तिथीस करावे; म्हणून दोन दिवस तिथी असेल अगर दोन्ही दिवस
(चंद्रोदयव्यापिनी ) नसेल तर दुसर्या दिवशी व्रत करावे.
अष्टमी श्राद्ध
अपराण्ह काळी अष्टमी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी आश्विन कृष्ण 8 असेल तर या दिवशी
श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment