Wednesday, 24 October 2018

दिनविशेष - २९ ऑक्टोबर २०१८



तिथी
आश्विन कृष्ण ५ (१५:०४)
वार
सोमवार
नक्षत्र
आर्द्रा (२९:०६)
योग
शिव (१९:५९)
करण
तैतिल (१५:०४), गरज (२६:०७)


शुक्र पूर्व दर्शन

शुक्र हा ग्रह आता सूर्योदयापूर्वी पूर्वेकडे दिसू लागेल. १८ ऑक्टोबरला पश्चिम दिशेला शुक्र अस्तंगत झाला होता.
ग्रहांचे सूर्य सानिध्यामुळे अदर्शन होते. यालाच अस्तअसे म्हणतात. आणि तोच ग्रह सूर्यापासून ठराविक अंतारावर गेला कि त्याचे दर्शन आपल्याला पूर्वेस अथवा पश्चिमेस होऊ लागते. त्याला उदयअसे म्हणतात.
सूर्यापासून प्रत्येक ग्रह जितक्या अंशावर असता आपल्याला त्याचे दर्शन होऊ शकते म्हणजेच ग्रहाचा उदय होतो, त्याला त्या ग्रहाचे कालांशअसे संबोधतात.
शुक्राचा कालांश ८ अंश असतो.
शुक्र हा अतिशय तेजस्वी आहे. पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर किंवा सायंकाळी सुर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर सुमारे तीन तासापर्यंत दिसू शकतो.
शुक्र हा शुभग्रह असल्यामुळे तो अस्तंगत असताना अनेक शुभ कार्यांना वर्ज असतो.
अस्त होण्यापूर्वी काही दिवस त्याच्या तेजाच्या वार्धक्याचे व उदयानंतर काही दिवस तेजाच्या बालात्वाचे म्हणूनही धर्म कार्यात वर्ज सांगितले आहेत.
बालत्व / वृद्धत्व
दिशा
दिवस
बालत्व
पूर्वेस उदय
१५ / १० / ७ / ५ / ३ दिवस
बालत्व
पश्चिमेस उदय
१५ / १० / ७
वृद्धत्व
पूर्वेस अस्त
१५ / १० / ७
वृद्धत्व
पश्चिमेस अस्त
१५ / १०/ ७ / ५


पंचमी-षष्ठी श्राद्ध

अपराण्ह काळी पंचमी आणि षष्ठी या दोन्ही तिथी असल्यामुळेश्राद्धतिथी आश्विन कृष्ण ५ किंवा आश्विन कृष्ण ६ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध क


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment