Friday, 19 October 2018

दिनविशेष - २१ ऑक्टोबर २०१८


तिथी
आश्विन शुक्ल १२ (२१:३१)
वार
रविवार
नक्षत्र
पूर्वाभाद्रपदा (अहोरात्र)
योग
वृद्धि (११:३८)
करण
बव (८:५१), बालव (२१:३१)



क्षीरदान-द्विदलव्रत

अशोकाद्वादशी

तिथिव्रत. आश्‍विन शुक्ल दशमीपासून प्रारंभ. यात केशवाची पूजा करायची असते. त्यादिवशी अल्पाहार, एकादशीस उपवास व द्वादशीस पारणा असा याचा विधी आहे. व्रतावधी एक वर्ष -
फल - आरोग्यलाभ व शोक-मुक्ती.

कौमुदीव्रत

एक विष्णुव्रत. आश्‍विन शुक्ल द्वादशीस व्रताचा प्रारंभ. त्या दिवशी कमळांनी विष्णूपूजा, त्रयोदशीस वैष्णवक्षेत्राची यात्रा, चतुर्दशीस उपवास व जागरण, पौर्णिमेला विष्णुपूजा व
'ॐ नमो नारायणाय, ॐ नमो वासुदेवाय'
या मंत्राचा जप, असा या व्रताचा विधी आहे.
फल वैकुंठप्राप्ती

द्वादशी श्राद्ध

अपराण्ह काळी द्वादशी तिथी असल्यामुळेश्राद्धतिथी आश्विन शुक्ल १२ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment