तिथी
|
भाद्रपद कृष्ण ३० (९:१७)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
हस्त (१२:०५)
|
योग
|
ऐन्द्र (१४:३१)
|
करण
|
नाग (९:१७), किंस्तुग्घ्न
(२०:१८)
|
इष्टि
इष्टि म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध
कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.
गजच्छाया पर्व
सूर्योदय ते ९:१७ गजच्छाया
योग आहे.
भाद्रपद महिन्याच्या
अमावस्येला हस्त नक्षत्र असता सूर्य व चंद्र यांचा योग होणे, यास गजच्छाया पर्व म्हणतात या दिवशी दान, श्राद्धादी कर्मे केली असता
अनंत फलाची प्राप्ती होते.
वद्य पक्षातील त्रयोदशीस
चंद्र मघा नक्षत्रात आणि सूर्य हस्त नक्षत्रात असेल, तर त्या योगालाही गजच्छाया
म्हणतात. सूर्य ग्रहणाच्या वेळीही गजच्छाया योग असतो.
मातामह श्राद्ध
मातामह श्राद्ध म्हणजे
आईच्या वडिलांचे श्राद्ध (दौहित्र). ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा (आईचे वडील)
जिवंत नाहीत अशा मुलांनाच दौहीत्राचा अधिकार असतो. आजोबा (आईचे वडील) गेल्यावर एक
वर्षाने दौहित्र करण्यास सुरवात करावी. स्वत:चे वडील गेल्यास दौहित्र करू नये.
दौहीत्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो.
प्रतिपदा श्राद्ध
अपराण्ह काळी प्रतिपदा तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी आश्विन
शुक्ल १ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर
३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर
३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment