तिथी
|
आषाढ शुक्ल ८ (१९:३४)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
चित्रा (२७:५४)
|
योग
|
शिव (१४:५९)
|
करण
|
विष्टि (६:२२)
|
दुर्गाष्टमी
प्रत्येक
महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन
शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
महिषाघ्निव्रत
आषाढ शुक्ल
अष्टमी दिवशी या व्रताचा उपवास असतो. या दिवशी हळदीच्या पाण्याने स्नान करावे व
तशाच पाण्याने महिषघ्निदेवीला स्नान घालावे आणि केशर, चंदन, धूप,
कापूर यांनी युक्त पूजा
करावी. नैवेद्यात तूप, साखर व गहू यांनी युक्त पदार्थ असावेत.
ब्राह्मण व ब्राह्मणकुमारी यांना भोजन देऊन मग स्वतः जेवावे. यायोगे सर्व प्रकारची
इष्ट सिद्धी प्राप्त होते.
भद्रा
६:२२ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment