Wednesday, 6 July 2016

दिनविशेष - ७ जुलै - २०१६



तिथी
 आषाढ शुक्ल ३ (१२:३८)  
वार
 गुरुवार
नक्षत्र
 आश्लेषा (१७:१२)
योग
 वज्र (१४:१८)
करण
 वणिज (२४:३५)

विनायक चतुर्थी

या चतुर्थीला 'शयनाख्या चतुर्थी' असे म्हणतात. या दिवशी निद्रित श्रीअनिरुद्धस्वरूप गणेशाची आवडीने पूजा करावी व संन्याशांना भोपळापात्र दान केल्याने मनुष्य़ इच्छित फल प्राप्त करतो. या दिवशी मंगलमूर्ती गणेशाची विधिपूर्वक पूजा केल्याने मनुष्य देवदुर्लभ फळ प्राप्त करतो. या दिवशी मध्याह्नकाळी आंदोळ्यावर भगवान आपल्या सर्व स्त्रियांसह शयन करतात. त्या दिवशी ब्रह्मदेवादी सर्व देवांनी त्यांची पूजा ते निद्रित असतानाच केली. त्यामुळे श्रीगणेश प्रसन्न होऊन त्यांनी या दिवशी कोणी माझी पूजा मला झोपाळ्यावर बसवून करील व मला झोपवील त्याला अक्षय्य सुख-संपत्ती व मुक्ती मी देईन, असा वर दिला आहे.

भद्रा

२४:३५ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment