तिथी
|
आषाढ शुक्ल १ (१४:३६)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
पुनर्वसु (१७:२८)
|
योग
|
व्याघात (१७:४८)
|
करण
|
बालव (२५:५१)
|
मासोपवासव्रत
आषाढ शुक्ल
प्रतिपदा ते पौर्णिमेपर्यंत हे व्रत केले जाते. यामध्ये भगवान विष्णूची पूजा व
स्वतः पंचगव्य घ्यावे. पौर्णिमेदिवशी व्रतसमाप्तीच्या वेळी ब्राह्मणभोजन घालून मग
स्वतः जेवावे. याप्रमाणे हे मोक्षदायी व्रत सतत १३ वर्षे करावे. आषाढात जर शक्य
झाले नाही, तर श्रावण किंवा भाद्रपद महिन्यात करता येते.
चंद्र दर्शन
अमावास्येला दिसेनासा
झालेला चंद्र रवीच्या पुढे १२ अंश गेला कि दिसू लागतो. २०:१० ला पश्चिम दिशेला
चंद्र दर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहे.
रविचा पुनर्वसु नक्षत्र प्रवेश
रवि
२२:३४ ला पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करत आहे. रविचे मृग
नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला
जातो.
रवि
चे नक्षत्र :
पुनर्वसु
चंद्र
नक्षत्र: पुष्य
वाहन कोल्हा
रवि
नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते
त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
|
वाहन
|
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
|
१
|
घोडा
|
पर्वतावर पाऊस पडेल
|
२
|
कोल्हा
|
पाऊस पडणार नाही.
|
३
|
बेडूक
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
४
|
मेंढा
|
पाऊस पडणार नाही.
|
५
|
मोर
|
अल्पवृष्टी होईल.
|
६
|
उंदीर
|
अल्पवृष्टी होईल.
|
७
|
महिष
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
८
|
गाढव
|
अल्पवृष्टी होईल.
|
० / ९
|
हत्ती
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
रवि
चे नक्षत्र :
पुनर्वसु
चंद्र
नक्षत्र: पुष्य
अंतर
: २
२
ला ९ ने भागले असता बाकी राहते २. म्हणून वाहन कोल्हा आहे. याचाच अर्थ रवि पुनर्वसु
नक्षत्रात असताना फारसा पाऊस पडणार नाही.
नक्षत्रसंज्ञा : चंद्र-चंद्र
सूर्य नक्षत्रे
|
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा,
जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
|
चंद्र नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा,
पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती
|
दोन्ही सूर्य नक्षत्रे
|
वारा सुटेल
|
दोन्ही चंद्र नक्षत्रे
|
पाऊस पडणार नाही
|
एक चंद्र व दुसरे सूर्य
|
पाऊस पडेल
|
रवि नक्षत्र : पुनर्वसु = चंद्र नक्षत्र
चंद्र नक्षत्र : पुष्य = चंद्र नक्षत्र
एक सूर्य व दुसरे चंद्रनक्षत्र आहे. याचा अर्थ रवि पुनर्वसु नक्षत्रात असताना फारसा पाऊस पडणार नाही.
स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री-स्त्री
स्त्री नक्षत्रे
|
आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा,
मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
|
पुरुष नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी,
मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा
,उत्तराभाद्रपदा, रेवती
|
नपुंसक नक्षत्रे
|
विशखा, अनुराधा, जेष्ठा
|
सूर्य
नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री
पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.
रवि नक्षत्र : पुनर्वसु = स्त्री नक्षत्र
चंद्र नक्षत्र : पुष्य = स्त्री नक्षत्र
दोन्ही
स्त्री नक्षत्र आहेत. त्यामुळे रवि पुनर्वसु नक्षत्रात असताना फारसा
पाऊस पडणार नाही.
पावसाचा
अंदाज घेताना या बरोबरच रविच्याच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह
स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.
इष्टि
इष्टि म्हणजे
यज्ञ.
यज्ञ
संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि
म्हणतात.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment