Sunday, 31 July 2016

दिनविशेष - १ ऑगस्ट - २०१६



तिथी
 आषाढ कृष्ण १४ (२७:१५)  
वार
 सोमवार
नक्षत्र
 पुनर्वसु (२६:०९)
योग
 वज्र (२७:२३)
करण
 विष्टि (१५:५५)

शिवरात्रि

कृष्ण चतुर्दशीला शिवरात्रि साजरी करतात. निशीथ काळी (रात्रीचा आठवा मुहूर्त) शिवपूजेचे विशेष महत्व आहे.

लोकमान्य टिळक पुण्यतिथी

जेष्ठ गणितज्ञ आणि पंचागकर्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे देहावसान १ ऑगस्ट, १९२० रोजी झाले.  त्यांच्या प्रेरणादायी पुण्यस्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा स्मुतीदिन साजरा केला जातो.

संत सावतामाळी पुण्यतिथी

सावता माळी ((जन्म:इ.स. १२५०; समाधी इ.स.१२९५) हे एक मराठी संतकवी होते.
सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वारसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे संत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे.
अरण येथे आषाढ कृष्ण चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले असे मानले जाते. परंतु या दिनांकाविषयी भेद् आहेत असे कळते.

भद्रा

१५:५५ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment