तिथी
|
आषाढ कृष्ण १२ (६:३१), आषाढ कृष्ण १३ (२८:४२)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
आर्द्रा (२६:५२)
|
योग
|
व्याघात (८:०५), हर्षण (२९:३६)
|
करण
|
गरज (१७:३४)
|
प्रदोष
सूर्यास्तानंतर
पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने
साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक
चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास
करतात.
‘कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष
आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक
वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन
'मम पुत्रादिप्राप्तिकामनया
प्रदोषव्रतमहं करिष्ये'
इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे
पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व
षोड्शोपचारे पूजा करावी.
भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥
भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण
करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा
लावताना आठ वेळा नमस्कार करावा.
'धर्मस्त्वं वृष रूपेण
जगदानन्दकारक।
अष्टमूर्तैरधिष्ठानं अथः पाहि सनातन ।'
या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला
स्पर्श करुन पुढील मंत्राने शंकर, पार्वती आणि नंदिकेश्वराची
प्रार्थना करावी.
ऋणरोगादि दारिद्र्यम ये चान्ये चापम्रुत्यव: !
भय क्लेश मनस्ताप: नश्यनंतु मम सर्वदा !!
"
( कर्ज,रोग,गरिबी,अपम्रूतू,भय, त्रास ईत्यादि मनस्ताप माझे कायमचे नाहिशे होवोत.)
हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या
स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी
भौम प्रदोष करावा.
Ø शुक्रवार: सौभाग्य किंवा
स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी
शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा.
Ø रविवार: आयुर्दायासाठी
अर्कप्रदोष हे व्रत करावे.
संत नामदेव पुण्यतिथी
संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते.
संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत
काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी
मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत
नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते. संत
नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत
ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.
संत नामदेव हे आषाढ कृष्ण त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी
एकवाक्यता दिसून येत नाही.
दग्ध योग
६:३१
पर्यंत रविवारी द्वादशी असल्यामुळे दग्धयोग होत आहे.
तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
भद्रा
२८:४२
नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment