तिथी
|
आषाढ कृष्ण ११ (८:३४)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
मृग (२७:५६)
|
योग
|
ध्रुव (१०:४८)
|
करण
|
कौलव (१९:३१)
|
कामिका एकादशी
आषाढ कृष्ण एकादशीचे नाव कामिका एकादशी असे आहे. ब्रह्महत्या आणि भृणहत्या
यांचे पाप नष्ट करणारी हि एकादशी आहे. या दिवशी शंख, चक्र आणि गदाधारी श्री विष्णुचे पूजन
करतात.
कामिका एकादशीच्या रात्री दीपदान आणि जागरण यांचे महत्व असते.
घबाड
८:३४
पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ
योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: पुष्य
चंद्र
नक्षत्र : मृग
तिथी: १५+११ = २६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २५
२५
x ३ = ७५
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे २६ तिथी
मिळवू : ७५ + २६ = १०१
आता
७ ने भागू १०१ / ७ = १४ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment