Tuesday, 5 July 2016

दिनविशेष - ६ जुलै - २०१६



तिथी
 आषाढ शुक्ल २ (१३:१६)  
वार
 बुधवार
नक्षत्र
 पुष्य (१६:५९)
योग
 हर्षण (१५:४६)
करण
 बालव (२४:५१)

द्वितीयाव्रत

आषाढ शुक्ल द्वितीयेस हे व्रत करतात. ही चंद्राची द्वितीय कला क्रियारूप असते. ही अश्‍विनीकुमारांची जन्मतिथी मानलेली आहे. ही द्वितीया 'रथद्वितीया' म्हणून ओळखली जाते. त्या दिवशी पुरीच्या जगन्नाथाची रथातून मिरवणूक काढतात. द्वितीयेचे रूपध्यान असे-
'द्वितीया हंसगा शुभ्रा पात्रपुस्तकधारिणी ।'

रथयात्रा महोत्सव

आषाढ शुक्ल द्वितीये दिवशी पुष्यनक्षत्र येईल तर सुभद्रेसह भगवानाला रथातून फिरवून आणावे व यथास्थान स्थापना करावी. या दिवशी जगन्नाथपुरीला श्रीजगदीशाला सपरिवार (बलराम, रुक्मिणी, सुभद्रा व श्रीकृष्ण ) विशाल रथात बसवून फिरवून आणतात. तो सोहळा अद्वितीय असतो. सर्व देशभर प्रांतातून अनेक लोक या यात्रेसाठी एकत्र आलेले असतात. त्याच दिवशी जयपूर वगैरे ठिकाणी भगवान रामचंद्रांना रथातून मिरवत नेतात व वाल्मीकी रामायणातील युद्धकांडाचा भाग वाचतात आणि त्याचवेळी धनधान्य पेरुन वार्षिक शेतीकार्यास सुरुवात करतात. त्या वेळी भगवंताच्या भक्तांच्या घरी व्रतउपवास असतो व महोत्सवही करतात. या व्रताच्या आचरणाने सर्व पापांतून मुक्ती मिळते व वैकुंठलोक प्राप्त होतो. त्या व्रतामुळे सर्पभय दूर होते. कारण भक्तांचे रक्षण स्वतः शेषनारायण करीत असतात.

दग्ध योग

१३:१६ नंतर बुधवारी तृतीया असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


रमजान ईद / ईद-उल-फित्र

हा मुस्लीम धर्मातील महत्वाचा सण आहे.  ईद उल फितर ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे.
ईद उलल फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लिम शरियत कायद्यातील मापदंड आहे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसांमध्ये मुस्लिम बांधवांच्या चेहर्‍यावर आनंद खुललेला दिसतो. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात.

मुस्लीम शव्वाल मासारंभ

इस्लामी कालगणनेनुसार शव्वाल मास आरंभ होत. आहे.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment