तिथी
|
श्रवण शुक्ल ८ (१३:००)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
विशाखा (१७:४४)
|
योग
|
ब्रह्मा (२६:४२)
|
करण
|
बालव (२६:०४)
|
दुर्गाष्टमी- दुर्गाव्रत
श्रावण शुक्ल अष्टमी दिवशी
प्रात:स्नानादी सर्व कृत्ये आटोपून पुन्हा स्नान करावे आणि ओली वस्त्रे धारण करूनच
देवीला स्नान घालून, खिरीचा नैवेद्य दाखवावा. आपणही एकवेळ खिरीचेच सेवन केल्यास
भगवती दुर्गा प्रसन्न होते.
प्रत्येक
महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन
शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
श्रावणी गुरुवार
दर गुरुवारी बुध-बृहस्पति
पूजन करावे.
सिहास्थ समाप्ति
गुरूचा
कन्या राशीत प्रवेश होत असल्यामुळे सिहास्थ महापर्वाची समाप्ति होत आहे.
गुरुपालट
२१:२९
वाजता गुरु कन्या राशीत प्रवेश करीत आहे. त्याचा पुण्यकाल सायंकाळी ७:३८ ते रात्री
११:२० पर्यंत आहे.
मिथुनेला
चवथा, कुंभेला आठवा आणि तूळ राशी साठी हा गुरु बारावा आहे. त्यांनी पीडा
परिहारार्थ पुण्यकालात जप, दान, पूजा करणे पुण्यकारक आहे.
गुरु
बदलाच्यावेळी चंद्र ज्या नक्षत्रात आहे ती राशी स्वजन्म राशीपासून कितवी आहे
यावरून तो ग्रह कोणत्या पदाने आला आणि त्याचे काय फल आहे हे ठरते.
राशी
|
पाद
|
फल
|
मिथुन, वृश्चिक, मकर
|
सुवर्ण
|
चिंता
|
कर्क, तूळ, मीन
|
रौप्य
|
शुभ
|
वृषभ, कन्या, कुंभ
|
ताम्र
|
श्री प्राप्ती
|
मेष, सिंह, धनु
|
लोह
|
कष्ट
|
गुरु
सुवर्ण पादाने आल्यास त्याचे फळ चिंता जरी असेल तरी सुवर्णपादी गुरु शुभ आहे.
दानवस्तु
: सुवर्ण, कांसे,
पुष्कराज, हरबऱ्याची डाळ, घोडा, साखर, पिवळे वस्त्र, पिवळी फुले
जपसंख्या
: १९ हजार
प्रतिमा : सुवर्ण प्रतिमा
जपमंत्र :
देवानांच ऋषीणांच
गुरुं कांचनसन्निभम्।
बुद्धिभूतं
त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्॥
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment