तिथी
|
श्रवण कृष्ण ११ (१५:२२)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
आर्द्रा (९:१८)
|
योग
|
सिद्धी (१२:५१)
|
करण
|
कौलव (२६:५३)
|
श्रावणी रविवार
दर
रविवारी गभस्ति सूर्याचे मौनाने पूजन करावे.
अजा एकादशी / कृष्णैकादशी
हे सुप्रसिद्ध व्रत श्रावण
कृष्ण एकादशी दिवशी करतात. हिचे 'अजा एकादशी' असे एक नाव आहे. या व्रताने
पापाचा नाश होऊन पुनर्जन्मापासून मनुष्य मुक्त होतो. प्राचीन काळी राजा हरिश्चंद्राने
ही एकादशी केल्याची व त्यामुळे त्याची पूर्वस्थिती परत आल्याची कथा आहे.
घबाड
९:१८ नंतर १५:२२ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: मघा
चंद्र
नक्षत्र : पुनर्वसु
तिथी: १५ + ११ = २६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २५
२५
x ३ = ७५
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे २६ तिथी मिळवू : ७५ + २६ = १०१
आता
७ ने भागू १०१ / ७ = १४ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
दग्ध
१५:२२ नंतर रविवारी द्वादशी
तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment