तिथी
|
श्रवण शुक्ल ६ (अहोरात्र)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
हस्त (९:०१)
|
योग
|
साध्य (२४:०२)
|
करण
|
कौलव (१९:०५)
|
श्रावणी
ऋक्
हिरण्यकेशी श्रावणी
श्रावणी सोमवार
दर सोमवारी महादेवाचे पूजन
करावे.
श्रावणी
सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठावे. पूर्ण घराची स्वच्छता करावी व स्नान करावे. गंगा
जल वा पवित्र पाणी घरात शिंपडावे. घरातच किंवा पवित्र ठिकाणी भगवान शिवाची मूर्ती
वा चित्र ठेवावे. पूजेची तयारी झाल्यानंतर खालील मंत्राने संकल्प करा.
'मम
क्षेमस्थैर्यविजयारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थं सोमव्रतं करिष्ये'
त्यानंतर
खालील मंत्राने ध्यान करा.-
'ध्यायेन्नित्यंमहेशं
रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं
रत्नाकल्पोज्ज्वलांग
परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्।
पद्मासीनं
समंतात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं
विश्वाद्यं
विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्॥
ध्यानानंतर
'ऊँ नमः शिवाय' हा मंत्र म्हणून शिव व पार्वतीची
षोडषोपचारे पूजा करा.
पूजेनंतर
व्रताची कहाणी ऐका. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा.मग भोजन वा फलाहार घ्या.
श्रावणी सोमवार व्रताचे फळ
सोमवारचे
हे व्रत नियमितपणे केल्यास भगवान शिव व पार्वतीची कृपा आपल्यावर होते.
जीवनात
संपन्नतेचा अनुभव येतो.
सर्व
संकटांना भगवान शिव दूर करतात.
शिवमुष्टि
तांदूळ.
श्रावणी सोमवारचे व्रत असते या दिवशी शंकराला शिवमूठ वाहिली जाते.
पहिल्या सोमवारी तांदळाची, दुसर्या सोमवारी तिळाची, तिसर्या सोमवारी मुगाची, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा असेल तर सातूची शिवमूठ वाहिली जाते.
आपल्या शेतात पिकलेलं धान्य देवाला अर्पण करण्याची वृत्ती इथं दिसून येते.
शंकराच्या १२ ज्योतीर्लिंग असलेल्या ठिकाणी भाविक मोठया संख्येने गर्दी करतात.
शिवामूठ वाहताना असे म्हणतात.
शिवा शिवा महादेवा,
माझी शिवामूठ ईश्वरा देवा.
सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा,
नावडती आहे ती आवडती कर रे देवा.
कल्की जयंती
पुराणांमध्ये
भगवान विष्णुंच्या दहा अवतारांचा उल्लेख आहे. आजवर नऊ अवतार झाले आहेत. दहावा
अवतार होणे शेष आहे. धर्मग्रंथांनुसार दहावा अवतार कल्कीचा असेल. श्रावण
महिन्याच्या शुक्ल पक्षात षष्ठीला हा अवतार पृथ्वीतलावर जन्मास येईल. म्हणूनच या
दिवशी कल्की जयंती साजरी करण्याची प्रथा आहे.
र्मग्रंथांमध्ये
कल्की अवताराविषयी विस्तृत वर्णन आहे. हा अवतार कलियुग आणि सत्ययुगाच्या संधीकालात
होईल. 64 कलांनी युक्त असा हा अवतार असेल. पुराणांमधील उल्लेखानुसार उत्तर
प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात शंभल नामक स्थानी विष्णुयशा नामक तपस्व्याच्या घरी
भगवान कल्की यांचा पुत्र रुपात जन्म होईल. कल्की देवदत्त नामक घोड्यावर स्वार होऊन
जगातल्या पापी लोकांचा संहार करतील. धर्माची पुनर्स्थापना करतील.
अवतार
होण्यापूर्वी पूजा होत असलेला हा एकमेव अवतार आहे. त्यामुळेच कल्कीची अनेक मंदिरे
आपल्या देशात आहेत. जयपूरच्या हवा महालासमोर कल्कीचे प्रसिद्ध मंदिर आहे.
सूपोदन-वर्णषष्ठी
पानावर तांदूळ व वाल ठेवून
स्त्रियांनी वाण द्यावे. व ते जलाशयात सोडावे.
श्रावण शु.
षष्ठीला हे व्रत करतात. व्रतावधी पाच वर्षे. व्रतदिनी शिवमंदिरात जाऊन शिवाची पूजा
करावी अगर प्रतिमेची पूजा घरीच करावी. पूजेनंतर शिवाला वरणभाताचा नैवेद्य दाखवावा.
नैवेद्यात खारावलेल्या आंब्याचा समावेश असावा. मग हे पदार्थ ब्राह्मणाला दान
द्यावेत. उद्यापनाच्या वेळी होमहवन करून त्यात चरू व आंब्यांची पाने यांच्या आहुती
द्याव्यात.
फल -
अपमृत्यूपासून मुक्तत.
घबाड
०९:०१
नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: आश्लेषा
चंद्र
नक्षत्र : चित्रा
तिथी: १५+११ = ६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६
x ३ = १८
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी
मिळवू : १८ + ६ = २४
आता
७ ने भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment