Saturday, 20 August 2016

दिनविशेष - २२ ऑगस्ट - २०१६



तिथी
 श्रवण कृष्ण ५ (२७:०९)  
वार
 सोमवार
नक्षत्र
 रेवती (१६:५८)
योग
 शूल (८:०४), गंड (२८:५३)
करण
 कौलव (१६:२६)

श्रावणी सोमवार

दर सोमवारी महादेवाचे पूजन करावे.

शिवमुष्टी

मूग.
श्रावणी सोमवारचे व्रत असते या दिवशी शंकराला शिवमूठ वाहिली जाते.
पहिल्या सोमवारी तांदळाची, दुसर्‍या सोमवारी तिळाची, तिसर्‍या सोमवारी मुगाची, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा असेल तर सातूची शिवमूठ वाहिली जाते.
आपल्या शेतात पिकलेलं धान्य देवाला अर्पण करण्याची वृत्ती इथं दिसून येते. शंकराच्या १२ ज्योतीर्लिंग असलेल्या ठिकाणी भाविक मोठया संख्येने गर्दी करतात.
शिवामूठ वाहताना असे म्हणतात.
शिवा शिवा महादेवा,
माझी शिवामूठ ईश्वरा देवा.
सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा,
नावडती आहे ती आवडती कर रे देवा.

कान्यायन

२२:०८ ला रवि सायन कन्या राशीत प्रवेश करीत आहे.

सौर शरदऋतु प्रारंभ

सौर कालगणनेनुसार शरदऋतु आरंभ होत आहे.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment