तिथी
|
श्रवण शुक्ल ११ (१७:३२)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
मूळ (२३:४६)
|
योग
|
विष्कंभ (२६:४६)
|
करण
|
बव (२९:४६)
|
पुत्रदा एकादशी/ शुक्लैकादशी
श्रावण शुक्ल
एकादशी पवित्रा, पुत्रदा व पापनाशिनी असते. यासाठी आदले दिवशी
दुपारी हविष्यान्न एकवेळ घ्यावे (एकभुक्त) एकादशी दिवशी प्रात:स्नानादी कर्मे
झाल्यावर
'मम समस्त दुरितक्षयपूर्वकं
श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं श्रावण शुक्लैकदशीव्रतमहं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून
भक्तिभावपुर्वक व यथाविधी परमेश्वराची पूजा करावी. अनेक प्रकारची फुले, फळे पत्री आणि नैवेद्य देऊन आरती करावी. त्यानंतर
रात्रीच्या वेळी गायन, वादन, नर्तन, कीर्तन आणि कथाश्रवण यांत रात्रभर जागरण करावे. दुसरे दिवशी
पारणे करून यथाशक्ती ब्राह्मणभोजन घालून मग स्वत: जेवावे. यामुळे पापाचा नाश होऊन
पुत्रादी प्राप्ती होते.
पवित्रार्पण विधी
श्रावण शुक्ल
एकादशीला देवाला पवित्रक अर्पण करतात. जरी सामान्यत: बाजारात मिळणार्या सुताचे वा
रेशमाचे पवित्रक करतात, तरी शास्त्रात त्याचे वेगळे विधान आहे.
त्याप्रमाणे मणी, रत्न, सोने, चांदी, तांबे, रेशीम, सूत, त्रिसर, पद्मसूत्र, कुशा, मुंज, कापूस अगर अन्य प्रकारापासून पवित्रक करावे अगर सुवासिनी
स्त्रीकडून सूत कातवून त्याच्या तीन दोर्यांचा त्रिगुणाने करून त्यापासून बनवावे.
रेशमाचे पवित्रक असेल तर त्यात आंगठ्याच्या पेराप्रमाणे यथाशक्ती ३६०, २७०,
१८०, १०८,
५४ , अगर २७ गाठी घालाव्यात. त्याची लांबी गुडघा, मांडी अगर बेंबीपर्यंत ठेवून त्यावर पंचगव्य प्रोक्षण करून
त्याला स्वच्छ पाण्याने धुवावे. नंतर
'ॐ' नमो नारायणाय'
चा १०८ वेळा जप
करून शंखोदक शिंपडावे आणि रात्रभर ठेवून व्रताच्या दुसर्या दिवशी धारण करावा.
त्यावेळी तुपाने भिजलेल्या दोन वाती अगर कापूर पेटवून आरती करावी. आणि
मणि -विद्रुममालाभिर्मंन्दारकुसुमदिभि:
।
इयं संवत्सरी
पूजा तवास्तु गरूडध्वज ॥
वनमाला यया देव
कौस्तुभं सततं ह्रदि ।
पवित्रमस्तु ते
तद्वत्पूजां च ह्रदये वह ॥'
असा श्लोक म्हणून
नमस्कार करावा. सत्ययुगात रत्नांचे, त्रेतायुगात सोन्याचे, द्वापार युगात रेशमाचे व कलियुगात सुताचे पवित्रकक धारण
करणे योग्य होय.
श्रावणी रविवार
दर
रविवारी गभस्ति सूर्याचे मौनाने पूजन करावे.
घबाड
१७:३२ नंतर २३:४६ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: आश्लेषा
चंद्र
नक्षत्र : मूळ
तिथी: १२
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११
x ३ = ३३
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १२ तिथी
मिळवू : ३३ + १२ = ४५
आता
७ ने भागू ४५ / ७ = ६ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
दग्ध योग
१७:३२ नंतर रविवारी द्वादशी
असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
भद्रा
१७:३२ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment