तिथी
|
श्रवण शुक्ल ३ (२६:४२)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
पूर्वाफाल्गुनी (२८:२६)
|
योग
|
परिघ (२२:४६)
|
करण
|
तैतिल (१४:१४)
|
महालक्ष्मी स्थापना व पूजन
श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची अराधना करावी. पहिल्या
शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र काढून त्याची पूजा करावी.
फुले, आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ, कुंकू लावलेला २१ मण्यांचा कापसाचा
चौसर तिला घालावा. सवाष्णींना भोजन व
हळदी-कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार करावा. श्रावणातल्या चारी
शुक्रवारी जिवतीची पुजा करावी. ही पुजा
संतती रक्षणार्थ मानली जाते. घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जिवतीमातेने
त्यांचे रक्षण करावे अशी तिला मनोभावे प्रार्थना करायची अशी प्रथा आहे.
श्रावणी शुक्रवार
दर
शुक्रवारी जरा–जीवंतिका पूजन करावे.
मुस्लीम जिल्काद मासारंभ
मुस्लीम
कालगणनेनुसार जिल्काद मास आरंभ होत आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment