Saturday, 30 January 2016

दिनविशेष - १ फेब्रुवारी २०१६

तिथी
 पौष कृष्ण ८ (२२:०६) 
वार
 सोमवार     
नक्षत्र
 स्वाती (१३:४६)
योग
 गंड (२३:५७)
करण
 बालव (०८:५८)

कालाष्टमी

प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

गुळवणी महाराज पुण्यतिथी

पौष कृष्ण अष्टमीला गुळवणी महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते.

यमघंट योग

१३:४६ नंतर सोमवारी विशाखा नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.

रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - ३० जानेवारी २०१६

तिथी
 पौष कृष्ण ६ (१७:०५) 
वार
 शनिवार     
नक्षत्र
 हस्त (७:४५)
योग
 धृति (२२:२३)
करण
 विष्टी (३०:२६)

मृत्यूयोग

७:४५ पर्यंत शनिवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त



यमघंट योग

७:४५ पर्यंत शनिवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


भद्रा


१७:०५ नंतर ३०:२६ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - ३१ जानेवारी २०१६

तिथी
 पौष कृष्ण ७ (१९:४४) 
वार
 रविवार     
नक्षत्र
 चित्रा (१०:५१)
योग
 शूल (२३:१७)
करण
 बालव (--:--)

भानुसप्तमी

रविवारी येणाऱ्या सप्तमीस भानुसप्तमी म्हणतात.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Friday, 29 January 2016

दिनविशेष - २९ जानेवारी २०१६

तिथी
 पौष कृष्ण ५ (१४:२५) 
वार
 शुक्रवार     
नक्षत्र
 हस्त (अहोरात्र)
योग
 सुकर्मा (२१:२५)
करण
 गरज (२७:४४)

सर्वसामान्य दिवस

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Wednesday, 27 January 2016

दिनविशेष - २८ जानेवारी २०१६

तिथी
 पौष कृष्ण ४ (११:५८) 
वार
 गुरुवार     
नक्षत्र
 उत्तराफाल्गुनी (२८:४३)
योग
 अतिगंड (२०:३५)
करण
 कौलव (२५:०९)

घबाड

११:५८ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: श्रवण
चंद्र नक्षत्र : उत्तराफाल्गुनी
तिथी: १५ + ४ = १९
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४ + १९ = ७३
आता ७ ने भागू  ७३ / ७ = १० ३/७

बाकी ३ म्हणून घबाड.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Saturday, 23 January 2016

दिनविशेष - २७ जानेवारी २०१६

तिथी
 पौष कृष्ण ३ (९:५५) 
वार
 बुधवार     
नक्षत्र
 पूर्वाफाल्गुनी (२५:५८)
योग
 शोभन (२०:००)
करण
 बव (२२:५३)

संकष्टी चतुर्थी

(पुणे चंद्रोदय: २१:१८)
ही वरदमूर्ती चतुर्थी आहे. या दिवशी गोमूत्र पिऊन दिवसभर उपवास करावा. सायंकाळी श्रीवरदमूर्ती गणेशाची पूजा करावी व आरती, मंत्रपुष्प करून गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. ब्राह्मणभोजन घालून मग आपण जेवावे. यायोगे एकाक्षरी मंत्राची सिद्धी प्राप्त होते. असे हे सर्वसिद्धिविनायक व्रत आहे. हे व्रत जो आचरील व कथा श्रवण करील, त्याचे निरंतर कल्याण होईल.
श्रीगणपतीच्या व्रतांपैकी हे दर महिन्यास येणारे एक संकटनाशक, महासिद्धिदायक असे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात जी चतुर्थी असते, त्या चतुर्थीस 'संकष्टी -चतुर्थी ' असे म्हण्तात. या दिवशी दिवसभर उपवास करावयाचा असतो. रात्रौ चंद्रदर्शनानंतर गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी व त्यानंतर चंद्राची पूजा करुन त्याला व चतुर्थी तिथीला अर्घ्य द्यावे, अशी पद्धत आहे. श्रीगणपती ही विघ्ननाशक देवता असल्याने हा या व्रतप्रभावाने ती प्रसन्न होते आणि सर्व विघ्नांचा नाश होतो, असे महात्म्य आहे. या दिवशी चंद्रदर्शनानंतर चंद्राची पूजा करुन पारणे करावयाचे असते; हे ह्या व्रताचे मुख्य अंग आहे. या दिवशी संध्याकाळी आंघोळ करुन श्रीगणपतीच्या पूजेची तयारी करून घ्यावी. पुजास्थानी घरातील गणेशमूर्ती असेल तर ती ठेवावी. नसल्यास सुपारी अक्षतापुंजावर ठेवून तिची गणपती म्हणून पूजा करावी. अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावीत. पूजा षोडशोपचारांनी पंचामृतअभिषेकासह करावी. आवर्तनाच्या प्रत्येक वेळी
'श्रीविघ्नविनायकदेवताभ्यो नमः '
असे म्हणावे. प्रारंभी संकल्प करताना 'अमुक संकटनाशनार्थ' असे म्हणून त्या संकटाचा उल्लेख करावा.चंद्राला अर्घ्य द्यावा. त्याच्या दिशेने गंध, फूल,अक्षता उडवाव्या व नमस्कार करावा. चतुर्थी तिथीला अर्घ्य ताम्हनात द्यावा व शेवटी महानैवेद्य दखवून पारणे करावे. कथा ऐकावी. यायोगे सर्व संकटाचा नाश होतो, व गणेशकृपा होते, असा अनुभव आहे.

दग्ध योग

९:५५ पर्यंत बुधवारी तृतीया तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी



घबाड

२५:५८ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: श्रवण
चंद्र नक्षत्र : उत्तराफाल्गुनी
तिथी: १५ + ४ = १९
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४ + १९ = ७३
आता ७ ने भागू  ७३ / ७ = १० ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा


९:५५ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट