Saturday, 16 January 2016

दिनविशेष - १७ जानेवारी २०१६

तिथी
 पौष शुक्ल ८ (१५:५८) 
वार
 रविवार     
नक्षत्र
 अश्विनी (२३:५७)
योग
 सिद्ध (१३:५३)
करण
 बालव (२७:०१)

दुर्गाष्टमी

प्रत्येक महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

जयंतिअष्टमी

पौष शुक्ल अष्टमी दिवशी बुधवार असून जर भरणीनक्षत्र असेल तर ती 'जयंती' होते. त्या दिवशी स्नान, दान, जप, होम, देवर्षिपितृतर्पण केल्यास, ब्राह्मणभोजन घातल्यास कोटिपट फळ मिळते.

महाभद्राष्टमी

पौष शुक्ल अष्टमीला बुधवार असेल तर त्या दिवशी स्नानदानादी गोष्टींनी शंकर प्रसन्न होतात, असा विश्‍वास आहे.

शाकंबरी देवी उत्सवारंभ

शाकंबरी देवीचा उत्सव आरंभ होत आहे. पौष शुक्ल नवमीस नवरात्र स्थापन करतात. सर्व विधान देवीनवरात्राप्रमाणेच असते. शाकंभरीस बनशंकरी असेही नाव आहे. बदामी येथे बनशंकरीदेवीचे मंदिर आहे. ही अनेक लोकांची कुलदेवता आहे. ही नवसाला पावते. या वेळी मोठा रथोत्सव असतो. नवरात्रसमाप्ती पौर्णिमेस होते.

ध्वजनवमी

पौष शुक्ल नवमीस हे नाव आहे. या तिथीला शाकंभरी असे म्हणतात. या दिवशी चंडिकेच्या पूजेचे विशेष महत्व आहे. पताकांनी देवीचे देऊळ सुशोभित करणे, कुमारिकांना भोजन घालणे आणि उपवास किंवा एकभुक्त करणे असा या व्रताचा विधी आहे.

फल- आरोग्य, शक्ती व संपत्ती यांची प्राप्ती.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment