तिथी
|
मार्गशीर्ष कृष्ण १२ (७:५५)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
अनुराधा (८:५७)
|
योग
|
गंड (१६:४७)
|
करण
|
गरज (२०:०९)
|
उभयद्वादशी
हे एक तिथिव्रत
आहे. व्रतारंभ मार्गशीर्ष कृष्ण द्वादशीला होतो. दर द्वादशीला विष्णूच्या केशव, नारायणादी एकेका रूपाची पूजा करतात. याप्रमाणे वर्षभरात
चोवीस रूपांची पूजा होते.
भृगूव्रत
हे तिथिव्रत आहे.
मार्गशीर्ष कृष्ण द्वादशीला हे व्रत आरंभतात. व्रतावधी एक वर्ष. भृगू नावच्या बारा
देवांची पूजा आणि हवन हा यातील मुख्य विधी आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य
द्वादशीला हे व्रत करावयाचे असते. उद्यापनाच्या वेळी गाय दान देतात.
सुरूप द्वादशी
मार्गशीर्ष कृष्ण
पुष्पयुक्त द्वादशीच्या आदल्या दिवशी रात्री जितेन्द्रिय राहून विष्णूचे ध्यान
करावे आणि श्वेत धेनूच्या शेणाच्या गोवर्या पेटवून त्या अग्नीत घृतादियुक्त
तिळाच्या १०८ आहुती देऊन हवन करावे. दुसरे दिवशी नदी, तलाव आदी
जलाशयावर स्नान करुन भगवंताच्या सोन्याच्या प्रतिमेची तिळाच्या पात्रात ठेवून पूजा
करावी. तीळ, फळे यांचा नैवेद्य दाखवावा. नंतर
'नमः परमशान्ताय विरूपाक्ष नमोस्तुते'
या मंत्राने
अर्घ्य द्यावा. ब्राह्मणभोजन घालून ती मूर्ती त्यास दान द्यावी.
प्रदोष
सूर्यास्तानंतर
पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने
साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक
चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास
करतात.
‘कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष
आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक
वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन
'मम पुत्रादिप्राप्तिकामनया
प्रदोषव्रतमहं करिष्ये'
इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे
पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व
षोड्शोपचारे पूजा करावी.
भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥
भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण
करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा
लावताना आठ वेळा नमस्कार करावा.
'धर्मस्त्वं वृष रूपेण
जगदानन्दकारक।
अष्टमूर्तैरधिष्ठानं अथः पाहि सनातन ।'
या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला
स्पर्श करुन पुढील मंत्राने शंकर, पार्वती आणि नंदिकेश्वराची
प्रार्थना करावी.
ऋणरोगादि दारिद्र्यम ये चान्ये चापम्रुत्यव: !
भय क्लेश मनस्ताप: नश्यनंतु मम सर्वदा !!
"
( कर्ज,रोग,गरिबी,अपम्रूतू,भय, त्रास ईत्यादि मनस्ताप माझे कायमचे नाहिशे होवोत.)
हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या
स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी
भौम प्रदोष करावा.
Ø शुक्रवार: सौभाग्य किंवा
स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी
शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा.
Ø रविवार: आयुर्दायासाठी
अर्कप्रदोष हे व्रत करावे.
वृद्धी तिथी
ज्या
तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ती क्षय तिथी असते.
लागोपाठच्या
दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
क्षय
तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी
पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment