Wednesday, 13 January 2016

दिनविशेष - १४ जानेवारी २०१६

तिथी
 पौष शुक्ल ५ (२२:०१) 
वार
 गुरुवार     
नक्षत्र
 पूर्वाभाद्रपदा (२७:५५)
योग
 वरीयान (२२:२९)
करण
 बव (११:०४)

धनुर्मास समाप्ति

सूर्य धनु राशीत असे पर्यंत म्हणजे मकर संक्रांती पर्यंत असणारा धनुर्मास किंवा झुंझुरमास समाप्त होत आहे.

भोगी

सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून देवाची पूजा करावी . धूतवस्त्र घालून स्वयंपाक करावा. यात तांदूळ व मुगच्या डाळीची खिचडी हा मुख्य पदार्थ असतो. तसेच वांग्याची भाजी व तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी यांचाही समावेश असतो. सूर्यास्त झाल्यावर देवाला व सूर्याला नैवेद्य दाखवून लगेच भोजन करावे.

रवि मकर रास प्रवेश

२५:२६ ला रवि मकर राशीत प्रवेश करत आहे.
रवि संक्रमणाच्या वेळी, मकर राशीसाठी संक्रमणानंतर ४० घटिका पुण्यकाळ असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत. पुण्याकालात स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत. म्हणून पुण्यकाल १५ जानेवारीला सूर्योदय  ते सूर्यास्त असा आहे.
सामुदायिक मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत. रविच्या राशी संक्रमाणाच्या वेळी असणाऱ्या चंद्र नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व त्यांची फळे पुढील प्रमाणे:
·         १५ : महर्घ / जघन्य : फळ = तेजी
·         ३० : साम्यार्घ : फळ = सम
·         ४५ : समर्घ : फळ = मंदी

दग्ध योग

२२:०१ नंतर गुरुवारी षष्ठी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी



घबाड

२७:५५ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: उत्तराषाढा
चंद्र नक्षत्र : उत्तराभाद्रपदा
तिथी: ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment