Wednesday, 13 January 2016

दिनविशेष - १५ जानेवारी २०१६

तिथी
 पौष शुक्ल ६ (१९:५७) 
वार
 शुक्रवार     
नक्षत्र
 उत्तराभाद्रपदा (२६:३३)
योग
 परिघ (१९:३५)
करण
 कौलव (८:५१), गरज (३०:५६)

मकर संक्रांति

संक्रांतीचा पुण्यकाल सूर्योदय ते सूर्यास्त आहे.
कर्तव्य :
१)      तिलमिश्रित उदकाने स्नान,
२)      तिळाचे उटणे अंगास लावणे,
३)      तिलहोम,
४)      तिलतर्पण,
५)      तिलभक्षण व
६)      तिलदान
असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग करावा. 
गुरुवारी उत्तररात्री १:२६ वाजता रवि मकर राशीत प्रवेश करत आहे.  कौलव करणावर संक्रांत होत असल्याने उक्त असलेले वाहनादि प्रकार पुढीलप्रमाणे
संक्रांतिवर्णन :
वाहन वराह असून उपवाहन बैल आहे.
वस्त्र : हिरवे वस्त्र परिधान केले आहे.
शस्त्र : हातात खड्ग घेतले आहे.
चंदनाचा टिळा लावलेला आहे.
वयाने तरुणी असून उभी आहे.
वासाकरता बकुळ घेतलेले आहे. 
भिक्षान्न भक्षण करीत आहे.
भूत जाति आहे.
भूषणार्थ रौप्य (चांदी) धारण केली आहे.
वारनाव नंदा असून नक्षत्रनाव घोरा आहे.
सामुदाय मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत.
पश्चिमेकडून पूर्वेस जात आहे व आग्नेय दिशेस पहात आहे.
पर्व काळात वर्ज कामे:
संक्रांतीच्या पर्व काळात पुढील कामे करू नयेत
·         दात घासणे,
·         कठोर बोलणे,
·         वृक्ष/गवत तोडणे,
·         गाई-म्हशींची धार काढणे,
·         कामविषय सेवन

संक्रांतिपर्वकाळात स्त्रियांनी करावयाची दाने:
·         नवे भांडे,
·         गाईला घास,
·         अन्न,
·         तिलपात्र,
·         गुळ तीळ,
·         सोने,
·         भूमि,
·         गाय,
·         वस्त्र,
·         घोडा

इत्यादि यथाशक्ति दाने करावीत.
संकल्प :
देशकाल कथन करून
मम आत्मन: सकलपुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री सवितृ प्रीतिद्वारा सकलपापक्षयपूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धि धनधान्यसमृद्धि दीर्घायुः महैश्वर्य मन्गलाभ्युदय सुखसंपादादि कल्पोक्तफ़ल सिद्धये अस्मिन् मकरसंक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय (अमुक) दानं करिष्ये |
असा संकल्प करून दानवस्तूचे व ब्राह्मणाचे पूजन करून दान-दक्षिणा द्यावे.

जन्मनक्षत्रानुसार संक्रांति फळ:
नक्षत्र
फळ
शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा
पंथा (प्रवास)
रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग
भोग (दु:ख)
आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य
व्यथा (आजार)
आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा
वस्त्रम् (वस्त्रप्राप्ती)
स्वाती, विशाखा, अनुराधा
हानि: (खर्च, नुकसान)
जेष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा
विपुलं धनं (मोठी अर्थप्राप्ती)
धार्मिक अर्थ:
मकर संक्रांती पासून उन्हाळ्याची सुरूवात होते. पृथ्वीचा उत्तर गोलार्धात प्रवेश होतो. हिंदू श्रद्धेनुसार सूर्य प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्वाचे रूप आहे, जे एक, अद्वैत, स्वयं प्रकाशमान, दैवत्वाचे प्रतिक आहे.
पुराणातील उत्तरायण:
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म ज्यांना इच्छामरणाचे वरदान होते, त्यांनी बाणांच्या शय्येवर पडून राहून या दिवशी देह त्याग केल्याचे सांगितले जाते. हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा शुभ मानला जातो.

बांगरषष्ठी


अमृत योग

२६:३३ नंतर शुक्रवारी रेवती नक्षत्र असल्यामुळे अमृतसिद्धी योग होत. आहे. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

घबाड

१९:५७ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: उत्तराषाढा
चंद्र नक्षत्र : उत्तराभाद्रपदा
तिथी: ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७

बाकी ३ म्हणून घबाड.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment