तिथी
|
मार्गशीर्ष कृष्ण १४ (७:५४),
मार्गशीर्ष अमावास्या (३१:०१)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
मूळ (१०:०१)
|
योग
|
ध्रुव (१४:०२)
|
करण
|
चतुष्पाद (१९:३१)
|
दर्श-वेळा अमावास्या
अमावस्या ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक
फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.
दर्शश्राद्ध : दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना
उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.
गौरीतप
हे स्त्रियांचे
एक व्रत. हे मार्गशीर्ष अमावस्येस करतात. या व्रतात मध्यरात्री मंदिरात जाऊन
शिव-पार्वतीची पूजा करावयाची असते. व्रतावधी सोळा वर्षे. नंतर मार्गशीर्ष
पौर्णिमेला उद्यापन करतात. याला 'महाव्रत ' असेही म्हणतात.
फल-पुत्रप्राप्ती.
महोदघी अमावस्या
मार्गशीर्ष
महिन्यातील चतुर्दशीने युक्त असलेल्या अमावस्येला हे नाव आहे. या दिवशी व्रतधारी
व्यक्तीने समुद्रस्नान करावयाचे असते.
फल-अश्वमेधाचे
पुण्य मिळते
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
क्षयदिन
ज्या
तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ती क्षय तिथी असते.
लागोपाठच्या
दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
क्षय
तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी
पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment