Saturday, 9 January 2016

दिनविशेष - ११ जानेवारी २०१६

तिथी
 पौष शुक्ल २ (२८:००) 
वार
 सोमवार     
नक्षत्र
 उत्तराषाढा (८:५७)
योग
 हर्षण (९:३८), वज्र (३१:०२)
करण
 बालव (१६:५२)

आरोग्यव्रत किंवा आरोग्य द्वितीया

पौष शुक्ल द्वितीये दिवशी गो-शृंगोदका (गाईची शिंगे धुऊन घेतलेले पाणी )- ने स्नान करावे. श्‍वेतवस्त्रे परिधान करावीत. सूर्यास्तानंतर बालेंदू म्हणजे द्वितीयेच्या चंद्राची पूजा करावी. जोपर्यंत त्याचा अस्त होत नाही ,तोपर्यंत गूळ, दही, परमान्न (खीर) आणि मीठ यांचे दान द्यावे. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर केवळ गाईच्या दुधाचे ताक प्राशन करून भूमिशयन करावे. याप्रमाणे प्रत्येक शुक्ल द्वितीयेला एक वर्षपर्यंत चंद्रपूजन व भोजनादी व्रत करावे व बाराव्या (मार्गशीर्ष) ला बालेंदुची यथासांग पूजा करावी आणि घागर भरुन उसाचा रस, सोने व वस्त्र ब्राह्मणाला दान देऊन मग स्वतः जेवावे. यायोगे रोगनिवृत्ती होऊन आरोग्यवृद्धी होते. सर्वप्रकारची सुखे प्राप्त होतात.
या दिवशी गुरुवार असेल, तर प्रातःस्नान झाल्यावर यथाविधी ब्रह्मदेवाची पूजा करून नक्तव्रत करावे. यायोगे उत्तम संपत्ती प्राप्त होते. यालाच विधिपूजा म्हणतात. हे व्रत ब्रह्मपुरात सांगितले आहे.

रवि उत्तराषाढा नक्षत्र प्रवेश

१८:५६ ला रवि उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश करत आहे.

चंद्रदर्शन

अमावास्येला दिसेनासा झालेला चंद्र रविच्या पुढे १२ अंश गेला कि चंद्रदर्शन होते. १९:४६ ला पश्चिमेकडे चंद्रदर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत. उत्तरशृंग आहे.

अमृतयोग

८:५७ नंतर सोमवारी श्रवण नक्षत्र असल्यामुळे अमृतसिद्धी योग होत. आहे. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज


मृत्यूयोग

८:५७ पर्यंत सोमवारी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment