तिथी
|
पौष शुक्ल ७ (१७:५६)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
रेवती (२५:१३)
|
योग
|
शिव (१६:४२)
|
करण
|
विष्टी (२८:५६)
|
उभय सप्तमी
हे व्रत पौष
शुक्ल सप्तमी दिवशी उपवास करून सकाळ, दुपार व सायंकाळ तिन्ही
वेळा गंध, फुले,घृतादीनी भगवान सूर्याची
पूजा करावी. तापलेल्या तुपात मीठ घालून त्यात तळलेल्या मोदकांचा (क्षारमोदकांचा)
सूर्यास नैवेद्य दाखवावा. ब्राह्मणांना भोजन द्यावे. गाय दान द्यावी आणि भूमिशयन
करावे, म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतात.
मार्तंड सप्तमी
पौष शुक्ल
सप्तमीस मार्तंड (सूर्य)- पूजा करावी. गाईचे दान द्यावे, याप्रमाणे वर्षभर
केल्यास व्रत करणार्यास उत्तम फल प्राप्त होते.
करिदिन
मकर
संक्रमणानंतरचा दिवस म्हणून हा करिदिन आहे.
कर्क
व मकर संक्रमण, ग्रहण दिवस, होळी, आयन दिन (उत्तरायण आणि
दक्षिणायनाचा दिवस), भावुका
अमावास्या व प्रेतदाहविधीचा दिवस अशा ६ प्रकारच्या दिवसांच्या दुसऱ्या दिवसाला
करिदिन म्हणतात. हे करिदिन सर्व शुभ कार्याला वर्ज समजले जातात.
भद्रा
१७:५६ नंतर २८:५६ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment