Saturday, 10 October 2015

दिनविशेष - ११ ऑक्टोबर २०१५

तिथी
 भाद्रपद कृ. १४ (२६:५९)
वार
 रविवार
नक्षत्र
 उत्तराफाल्गुनी (२२:३४)
योग
 ब्रह्मा (२१:२०)
करण
 विष्टी (१३:३८)

शिवरात्रि

कृष्ण चतुर्दशीला शिवरात्रि साजरी करतात. निशीथ काळी (रात्रीचा आठवा मुहूर्त) शिवपूजेचे विशेष महत्व आहे.

अघोर चतुर्दशी

भाद्रपद कृष्ण चतुर्दशीचे हे नाव. या दिवशी उपवास करून शिवपूजा करतात.
भाद्रे मास्यस्थिते पक्षे अघोराख्या चतुर्दशी ।
तस्यामाराधित: स्थाणुर्नयेच्छिवपुर ध्रुवम् ॥
अर्थ - भाद्रपद व. चतुर्दशीला अघोरा असे नाव आहे. त्या दिवशी शंकराची पूजा केली असता तो भक्‍ताला शिवलोकी नेतो.

शास्त्रदिहत पितृ श्राद्ध / दुर्मरणश्राद्ध

जो मनुष्य तिर्यग्योनी (मनुष्येतर, कुत्रा आदी पशू, पक्षी ) प्राण्याच्या दंशाने आणि विष-शस्त्राच्या आघाताने मृत असेल, किंवा ब्राह्मणद्वारा हत्या झाली असेल (ब्रह्मघाती ) तर त्याचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण चतुर्दशीला केल्याने त्याचा आत्मा तृप्ती पावतो.

रवि चित्रानक्षत्र प्रवेश

०६:४५ ला रवि चित्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे. रविचे मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला जातो.
रविचे नक्षत्र : चित्रा

चंद्र नक्षत्र: उत्तराफाल्गुनी

वाहन गाढव

रवि नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते त्याप्रमाणे वाहन ठरते. बाकी ८. म्हणून वाहन गाढव आहे.

स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री-स्त्री

सूर्य नक्षत्र व चंद्र नक्षत्र दोन्ही स्त्री संज्ञक नक्षत्रे आहेत.

सूर्य-सूर्य

सूर्य नक्षत्र व चंद्र नक्षत्र दोन्ही सूर्य संज्ञक नक्षत्रे आहेत.

अमृतयोग

२२:३४ नंतर रविवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे होणारा अमृतसिद्धी योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

भद्रा


१३:३८ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment