Monday, 19 October 2015

दिनविशेष - २० ऑक्टोबर २०१५

तिथी
 आश्विन शु ७ (१४:२३)
वार
 मंगळवार
नक्षत्र
 पूर्वाषाढा (१४:३४)
योग
 सुकर्मा (२१:२५)
करण
 विष्टी (२६:०१)

त्रिरात्रोत्सवारंभ

नवरात्र सुरू होण्यापूर्वी अशौच आले व महानवमीपूर्वी अशौच संपत असेल तर त्यानंतर सात, पाच, तीन अथवा एक दिवस जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्र करावे. अशौचामुळे वर सांगितल्यामुळे कमी दिवसांचे नवरात्र करतात. अशा दिवसांचा उल्लेख सप्तरात्रोत्सवारंभ, पंचरात्रोत्सवारंभ, त्रिरात्रोत्सवारंभ अशा प्रकारे केलेला असतो. अशा दिवशी घटस्थापना करून नवमीपर्यंत नवरात्रीची पूजा करता येते.

महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे)

एक धार्मिक नृत्यप्रकार. आश्‍विन शु. अष्टमीच्या दिवशी मुखवट्याची लक्ष्मी करतात. या प्रसंगी सुवासिनी स्त्रियां घागर फुंकून नृत्य करतात. या प्रसंगी स्त्रिया पदर बांधतात व दोन्ही हातांनी घागर उचलून तिच्यात फुंकर घालून नाद घुमवतात.

सरस्वती बलिदान

नवरात्रामध्ये मूळ नक्षत्रावर भगवती श्रीसरस्वतीचे आवाहन करतात. दुस-या दिवशी पूर्वाषाढा नक्षत्रावर पूजन व तिस-या दिवशी उत्तराषाढा नक्षत्रावर सरस्वतीला बलिदान अर्पण करून तिचे विसर्जन करतात. हा उत्सव विशेषत: बंगाल प्रांतात साजरा होतो.

भद्रा


१४:२३ नंतर २६:०१ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment