तिथी
|
भाद्रपद कृ. ६ (१५:१९)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
रोहिणी (०७:२७)
|
योग
|
व्यतीपात (२०:२५)
|
करण
|
विष्टि (२६:५३)
|
अमृतयोग
७:२७ पर्यंत शनिवारी रोहिणी
नक्षत्र असल्यामुळे होणारा अमृतसिद्धी योग होत आहे.
इतर सर्व कार्यासाठी हा शुभ
योग असला तरी प्रयाणास वर्ज आहे. हा योग नक्षत्र आणि वार
यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा
योग होतो.
रविवार – हस्त
|
सोमवार – मृग / श्रवण
|
मंगळवार – अश्विनी
|
बुधवार – अनुराधा
|
गुरुवार – पुष्य
|
शुक्रवार – रेवती
|
शनिवार – रोहिणी
|
|
हा सामन्यात:
सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
|
विवाहास वर्ज
|
शनिवार – रोहिणी
|
प्रयाणास वर्ज
|
मंगळवार – अश्विनी
|
गृहप्रवेशास वर्ज
|
चंद्रषष्ठी
हे भाद्रपद कृष्ण
षष्ठीचे नाव आहे. या दिवशी करावयाच्या व्रतासाठी स्त्रिया उपवास करतात, व चंद्रोदयाच्या वेळी त्याला अर्घ्य देतात.
फल - पुत्रप्राप्ती
भद्रा
१५:१९ नंतर २६:५३ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
आज ज्ञानेश्वरी जयंती
ReplyDelete!! कपिलाषष्ठी !!
कपिलाषष्ठी योग हा दुर्मिळ असून, हा साधारणपणे दर साठ वर्षानी एकदा येतो आणि म्हणूनच इतर योगांच्या तुलनेत त्याला `दुर्मिळ' हे विशेषण लावले जाते.
१) भाद्रपद कृष्ण पक्षातील
२) षष्ठी तिथीच्या वेळी
३) सूर्य हस्त नक्षत्रात असेल,
४) व्यतिपात योग असेल,
५) मंगळवार (किंवा रविवार असेल) व
६) चंद्र रोहिणी नक्षत्रात असेल तर त्या षष्ठीला `कपिलाषष्ठी' असे म्हणतात.
या सर्व गोष्टी एकत्र जमून येणे महाकठीण. परंतु साधारणतः दर साठ वर्षानी या गोष्टी एकत्र येण्याची शक्यता असते.
पन वारकरी संप्रदायाचं व पुर्ण विश्वाच भाग्य ऊदयाला आल ते याच महीन्यात पर्वकाळावर विश्व संत ज्ञानराज माऊलीच्या अमृतवाणी तुन निघेलेली ही ब्रम्हसाम्राज्य दिपीका याच पर्वकाळातील नाथ बाबा वर्णन करतात
बहुकाळ पर्वनी गोमटी !
भाद्रपद मास कपिलाषष्ठी !
प्रतीष्टान गोदातटी !
लेखन कामासाठी संपुर्ण जाहली !!
ते स्थळ अहमदनगर जिल्ह्य़ातील नेवासे येथे. दुगधशर्करा योग म्हणजे हे वर्ष माऊलीच्या ज्ञानेश्वरीच सप्तशतकोत्तर रजत महोत्सवी वर्ष आहे.