तिथी
|
भाद्रपद अमावास्या (२९:३६)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
हस्त (२५:४१)
|
योग
|
ऐंद्र (२२:२२)
|
करण
|
चतुष्पाद (१६:१८)
|
सर्वपित्री अमावास्या
या भाद्रपद
अमावस्ये दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध करतात.
दर्शश्राद्ध
दर्शाच्या दिवशी
केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी
यांना उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.
सोमवती अमावास्या
सोमवारी
असणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात.
भादवी पोळा
काही भागात
श्रावणी, तर काही भागात भादवी (भाद्रपद महिन्यातील) पोळा
सण साजरा होतो. पोळा सणात ‘बैल' हा केंद्रबिंदू असला, तरी त्याचा आशय
व्यापक अर्थाने पशुधनाबाबत आहे. वर्षभर आपल्या कारभाऱ्याच्या बरोबरीने मेहनत
करणारा, त्याच्या सुख-दुःखाचा साथीदार असलेला बैल हा
शेतकऱ्याचा खरा मित्र. या मित्राने आपल्या कुटुंबासाठी केलेल्या ऋणातून उतराई
होण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो.
कुशग्रहणी
भाद्रपद अमावास्येचे नव. या
दिवशी दर्भ कापून धर्मकृत्यांसाठी त्यांचा संचय करावा. असे सांगितले आहे.
गजच्छाया पर्व
भाद्रपद महिन्याच्या
अमावास्येला हस्त नक्षत्र असता सूर्य व चंद्र यांचा योग होणे, यास गजच्छाया पर्व म्हणतात या दिवशी दान, श्राद्धादी कर्मे केली असता
अनंत फलाची प्राप्ती होते.
वद्य पक्षातील त्रयोदशीस
चंद्र मघा नक्षत्रात आणि सूर्य हस्त नक्षत्रात असेल, तर त्या योगालाही गजच्छाया
म्हणतात. सूर्य ग्रहणाच्या वेळीही गजच्छाया योग असतो.
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment