Monday, 5 October 2015

दिनविशेष - ६ ऑक्टोबर २०१५

तिथी
 भाद्रपद कृ. ९ (१५:३८)
वार
 मंगळवार
नक्षत्र
 पुनर्वसु (०९:०१)
योग
 शिव (१७:४१)
करण
 वणिज (२८:१९)

अविधवा नवमी

भाद्रपद व. नवमीस हे नाव आहे. या दिवशी स्वत:ची माता अथवा कुटुंबातील अन्य कोणी स्त्री अहेवपणी (सधवा) मृत झाली असल्यास तिचे श्राद्ध करतात. यात ब्राह्मणभोजनाप्रमाणे सुवसिनीलाही भोजन घालण्याची रूढी आहे. या दिवशीं पिता जिवंत असुन माता मृत असेल अशा गृहस्थानें श्राध्द करावयाचें असतें. हें श्राध्द सपिंडक करावें.  माता मृत असून पुढें कांहीं दिवसांनीं पिता मृत झाल्यास हें अविधवा नवमी श्राध्द करु नये असे म्हणतात.

घबाड

१५:३८ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: हस्त
चंद्र नक्षत्र : पुष्य
तिथी: १५+१० = २५
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२३ x ३ = ६९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १५+१० = २५ तिथी मिळवू : ६९+२५ = ९४
आता ७ ने भागू  ९१ / ७ = १३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा


२८:१९ नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment