Sunday, 11 September 2016

दिनविशेष - १२ सप्टेंबर – २०१६



तिथी
 भाद्रपद शुक्ल १० (८:०६)  
वार
 सोमवार
नक्षत्र
 पूर्वाषाढा (९:५६)
योग
 सौभाग्य (११:३१)
करण
 वणिज (२०:०७)

दशावतारव्रत

हे व्रत भाद्रपद शुक्ल दशमीला करतात. यासाठी जलाशयावर जाऊन स्नान करून देव व पितर यांचे तर्पण करावे. नंतर आपल्या हाताचे दोन पसे कणीक घेऊन त्यापासून काही मिष्टान्न (अपूप) बनवून 'मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, राम, कृष्ण, परशुराम, बौद्ध व कल्की या दशावतारांचे यथाविधी पूजन करून अपूपांपैकी १० देवतांना, १० ब्राह्मणांना व १० आपण घेऊन मग जेवावे. अशा प्रकारे दहा वर्षेपर्यंत अपूप, घीवर, कासार, मोदक, तिखटमिठाची पुरी, साखरपारे, डोवठे, गुणा, कोकर व पुष्पकर्ण या दहापैकी दरवर्षी एक पदार्थ देवांना दहाच्या संख्येत अर्पण केल्यास विष्णुलोकाची प्राप्ती होते.

दग्ध योग

०८:०६ नंतर सोमवारी एकादशी तिथी असल्यामुळे दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


भद्रा

२०:०७ नंतर भद्रा म्हणजे विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष माणू नये.

योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय. तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून सर्व कार्यास प्रशस्त मानावे.


मृत्यूयोग

९:५६ नंतर सोमवारी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे मृत्ययोग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने वंग प्रांतात पहिला जातो. 
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.


बकरी ईद / / ईद-उल-जुहा

इस्लाम धामियांचा हा एक प्रमुख सण आहे. हजारात इब्राहीमने याच दिवशी स्वत:चा पुत्र हजारात इस्माइल याचा खुदाच्या आज्ञेनुसार खुदा साठी त्याग केला होता. नंतर अल्लाहने त्याला जीवनदान दिले अशी कथा प्रचलित आहे. म्हणून या दिवशी आपल्या सर्वात आवडत्या गोष्टीचा त्याग करतात.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment