तिथी
|
भाद्रपद कृष्ण ४ (११:५८)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
भरणी (२०:११)
|
योग
|
व्याघात (९:००), हर्षण (२९:२७
|
करण
|
कौलव (२२:२८)
|
भरणी श्राद्ध
भरणीश्राद्ध
अपिंडक षड्देवतांच्या उद्देशाने सांकल्पविधीने करावे. याला धूरिलोचन अथवा
पुरूरवार्द्रव हे देव घ्यावे. भरणी श्राद्ध काम्य आहे. गयाश्राद्धाचे फल
इच्छिणाराने प्रतिवर्षी करावे.
पंचमी श्राद्ध
श्राद्धतिथी पंचमी असेल तर
या दिवशी महालय करावा.
घबाड
११:५८ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: उत्तराफाल्गुनी
चंद्र
नक्षत्र : भरणी
तिथी: १५ + ४ = १९
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८
x ३ = ५४
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४ + १९ = ७३
आता
७ ने भागू ७३ / ७ = १० ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
दग्धयोग
११:५८ नंतर मंगळवारी पंचमी
तिथी असल्यामुळे दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment