तिथी
|
भाद्रपद कृष्ण ११ (२५:०३)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
पुष्य (१५:०३)
|
योग
|
शिव (१५:४१)
|
करण
|
बव (१२:५९)
|
इंदिरा एकादशी / कृष्णैकादशी
या एकादशीला
इंदिरा एकादशी म्हणतात. हे व्रत केल्याने सर्व पापे दूर होतात व पितरांचा उद्धार
होतो. त्यासाठी सकाळी स्नान करून उपवास करावा आणि हरिचिंतनात रात्र घालवावी. जर या
दिवशी पितृश्राद्ध-तिथी असेल तर व उपवासामुळे श्राद्धीय अन्न ग्रहण करण्यास संकोच
वाटेल तर त्याचा वास घेऊन ते गाईस घालावे आणि पारणे केल्यावर भोजन करावे.
एकादशी श्राद्ध
श्राद्धतिथी एकादशी असेल तर
या दिवशी महालय करावा.
रविचा हस्त नक्षत्रात प्रवेश
२४:०० ला रवि हस्त नक्षत्रात प्रवेश करत आहे. रविचे
मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला
जातो.
रवि
नक्षत्र : हस्त
चंद्र
नक्षत्र: आश्लेषा
वाहन उंदीर
रवि
नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते
त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
|
वाहन
|
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
|
१
|
घोडा
|
पर्वतावर पाऊस पडेल
|
२
|
कोल्हा
|
पाऊस पडणार नाही.
|
३
|
बेडूक
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
४
|
मेंढा
|
पाऊस पडणार नाही.
|
५
|
मोर
|
अल्पवृष्टी होईल.
|
६
|
उंदीर
|
अल्पवृष्टी होईल.
|
७
|
महिष
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
८
|
गाढव
|
अल्पवृष्टी होईल.
|
० / ९
|
हत्ती
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
रवि
नक्षत्र : हस्त
चंद्र
नक्षत्र: आश्लेषा
अंतर : २४
२४
ला ९ ने भागले असता बाकी राहते ६. म्हणून वाहन उंदीर आहे. याचाच अर्थ रवि हस्त
नक्षत्रात असताना अल्पवृष्टी होईल.
नक्षत्रसंज्ञा : सूर्य-चंद्र
सूर्य नक्षत्रे
|
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा,
जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
|
चंद्र नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा,
पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती
|
दोन्ही सूर्य नक्षत्रे
|
वारा सुटेल
|
दोन्ही चंद्र नक्षत्रे
|
पाऊस पडणार नाही
|
एक चंद्र व दुसरे सूर्य
|
पाऊस पडेल
|
रवि
नक्षत्र : हस्त = सूर्य नक्षत्र
चंद्र
नक्षत्र: आश्लेषा = चंद्र
नक्षत्र
एक चंद्र व दुसरे सूर्य नक्षत्र आहे. याचा अर्थ रवि हस्त नक्षत्रात असताना चांगला पाऊस पडेल.
स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री, स्त्री
स्त्री नक्षत्रे
|
आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा,
मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
|
पुरुष नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी,
मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा
,उत्तराभाद्रपदा, रेवती
|
नपुंसक नक्षत्रे
|
विशखा, अनुराधा, जेष्ठा
|
सूर्य
नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री
पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.
रवि
नक्षत्र : हस्त = स्त्री नक्षत्र
चंद्र
नक्षत्र: आश्लेषा = स्त्री
नक्षत्र
दोन्ही
स्त्री नक्षत्र आहे. त्यामुळे रवि हस्त नक्षत्रात असताना अल्पवृष्टी
होईल.
पावसाचा
अंदाज घेताना या बरोबरच रविच्याच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह
स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.
घबाड
१५:०३ नंतर २४:०० पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: उत्तराफाल्गुनी
चंद्र
नक्षत्र : आश्लेषा
तिथी: १५ + ११ = २६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २५
२५
x ३ = ७५
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे २६ तिथी मिळवू : ७५ + २६ = १०१
आता
७ ने भागू १०१ / ७ = १४ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
दग्ध
२५:०३ पर्यंत सोमवारी एकादशी
तिथी असल्यामुळे दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment