तिथी
|
भाद्रपद कृष्ण अमावास्या (२९:४१)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
उत्तराफाल्गुनी (२१:२७)
|
योग
|
शुक्ल (१४:२८)
|
करण
|
चतुष्पाद (१६:४६)
|
सर्वपित्री अमावास्या
या भाद्रपद
अमावस्येदिवशी सर्व पितरांचे श्राद्ध करतात.
दर्शश्राद्ध
दर्शाच्या दिवशी
केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी
यांना उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.
भादवी पोळा
काही भागात
श्रावणी, तर काही भागात भादवी (भाद्रपद महिन्यातील) पोळा
सण साजरा होतो. पोळा सणात ‘बैल' हा केंद्रबिंदू असला, तरी त्याचा आशय
व्यापक अर्थाने पशुधनाबाबत आहे. वर्षभर आपल्या कारभाऱ्याच्या बरोबरीने मेहनत
करणारा, त्याच्या सुख-दुःखाचा साथीदार असलेला बैल हा
शेतकऱ्याचा खरा मित्र. या मित्राने आपल्या कुटुंबासाठी केलेल्या ऋणातून उतराई
होण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो.
कुशग्रहणी
भाद्रपद अमावास्येचे नावव.
या दिवशी दर्भ कापून धर्मकृत्यांसाठी त्यांचा संचय करावा. असे सांगितले आहे.
अमावास्या श्राद्ध
श्राद्धतिथी अमावास्या असेल
तर या दिवशी महालय करावा.
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment