तिथी
|
भाद्रपद शुक्ल १२ (७:०३), भाद्रपद शुक्ल १३ (२९:२७)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
श्रवण (१०:०७)
|
योग
|
अतिगंड (०८:२५), सुकर्मा (३०:०१)
|
करण
|
कौलव (१८:२०)
|
प्रदोष
सूर्यास्तानंतर
पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने
साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक
चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास
करतात.
‘कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष
आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक
वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन
'मम पुत्रादिप्राप्तिकामनया
प्रदोषव्रतमहं करिष्ये'
इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे
पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व
षोड्शोपचारे पूजा करावी.
भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥
भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण
करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा
लावताना आठ वेळा नमस्कार करावा.
'धर्मस्त्वं वृष रूपेण
जगदानन्दकारक।
अष्टमूर्तैरधिष्ठानं अथः पाहि सनातन ।'
या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला
स्पर्श करुन पुढील मंत्राने शंकर, पार्वती आणि नंदिकेश्वराची
प्रार्थना करावी.
ऋणरोगादि दारिद्र्यम ये चान्ये चापम्रुत्यव: !
भय क्लेश मनस्ताप: नश्यनंतु मम सर्वदा !!
"
( कर्ज,रोग,गरिबी,अपम्रूतू,भय, त्रास ईत्यादि मनस्ताप माझे कायमचे नाहिशे होवोत.)
हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या
स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी
भौम प्रदोष करावा.
Ø शुक्रवार: सौभाग्य किंवा
स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी
शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा.
Ø रविवार: आयुर्दायासाठी
अर्कप्रदोष हे व्रत करावे.
दधिदान-क्षीरव्रत
भाद्रपद
शुक्लपक्षी श्रवणयुक्त द्वादशीचे दिवशी रात्री देवपूजा करावी; रात्री असंभव असेल तर दिवसास करावी; आणि दधिव्रत निवेदन
करून दधिदान करावे व दुग्धव्रताचा संकल्प करावा. या पयोव्रताविषयी दुधापासून
होणारे व दुधामध्ये शिजविलेले पदार्थ वर्ज्य करावे. दही इत्यादि वर्ज्य करू नयेत.
याप्रमाणे दधिव्रतामध्ये ताक इत्यादि वर्ज्य नाहीत. प्रसूत झालेल्या गायीचे दहा
दिवसांमधील दूध आणि संधिनी (वृषभाने आक्रमलेली) गायीचे दुध यांचा ज्या ठिकाणी
निषेध सांगितला आहे तेथे त्या दुधापासून होणारी दही, ताक इत्यादि सर्व
वर्ज्य करावी.
अवियोग द्वादशी
या दिवशी शिव, गौरी, ब्रह्मा, सावित्री, विष्णू, लक्ष्मी, सूर्य, नि क्षुभा यांची पूजा करावी, असे सांगितले
आहे.
ओघद्वादशी
भाद्रपद शुक्ल
द्वादशीला ओघद्वादशी असे दुसरे नाव आहे.
कल्कीद्वादशी
भाद्रपद शुक्ल
द्वादशीचे कल्कीद्वादशी असे दुसरे नाव आहे. या दिवशी कल्की या अवताराची पूजा करावी, असे सांगितले आहे.
घबाड
७:०३ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: उत्तराफाल्गुनी
चंद्र
नक्षत्र : श्रवण
तिथी: १२
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११
x ३ = ३३
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता
७ ने भागू ४५ / ७ = ६ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
क्षय तिथी
ज्या
तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या
दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
क्षय
तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी
पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment