Thursday, 22 September 2016

दिनविशेष - २३ सप्टेंबर – २०१६




तिथी
 भाद्रपद कृष्ण ८ (२६:४१)   
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 मृग (१५:२२)
योग
 व्यतीपात (२०:४२)
करण
 बालव (१५:२६)


कालाष्टमी

प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

एक काम्य व्रत.

भाद्रपद कृष्ण अष्टमीला आर्द्रा नक्षत्र असेल त्या दिवशी या व्रताला प्रारंभ करतात. यात उमा-महेश्वराची सुवर्ण मूर्तीला पंचामृताचे स्नान घालून त्यांची पूजा करतात. मग कणकेमध्ये पंचामृत घालून ती मळतात व तिच्यापासून मासा वगैरे प्राण्यांच्या आकाराचे बत्तीस खाद्य पदार्थ करून त्यांचा नैवेद्य दाखवतात. मग त्या सुवर्णमूर्ती व खाद्यपदार्थ एका ब्राह्मणाला दान देतात.
फल- पापनाश; संपत्ती, दीर्घायुष्य व कीर्ती प्राप्ती

अष्टमी श्राद्ध

श्राद्धतिथी अष्टमी असेल तर या दिवशी महालय करावा.

भारतीय अश्विन मासारंभ

भारतीय कालगणनेनुसार अश्विन मास आरंभ होत आहे.

मध्याष्टमी श्राद्ध


दग्धयोग

२६:४१ पर्यंत शुक्रवारी अष्टमी तिथी असल्यामुळे दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment