Monday, 26 September 2016

दिनविशेष - २७ सप्टेंबर – २०१६



तिथी
 भाद्रपद कृष्ण १२ (२५:३४)   
वार
 मंगळवार
नक्षत्र
 आश्लेषा (१६:००)
योग
 शिव (१४:५१)
करण
 कौलव (१३:१५)


तिथीवासर

७:११ पर्यंत तिथीवासर / हरिवासर आहे.
द्वादशीच्या प्रथम पादाला हरीवासर असे म्हणतात. वैष्णवांनी या काळात भोजन करू नये.

द्वादशी श्राद्ध

श्राद्धतिथी द्वादशी असेल तर या दिवशी महालय करावा.

संन्यासिनां महालय

जर एखाद्याचा पिता यती (संन्यासी) किंवा वनवासी असेल तर त्याचे श्राद्ध भाद्रपद वद्य द्वादशीला करावे.

गजगौरी व्रत (हादगा भोंडला)

नवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हत्तीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment