तिथी
|
भाद्रपद शुक्ल २ (१७:०१)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
उत्तराफाल्गुनी (१४:२७)
|
योग
|
साध्य (७:२५)
|
करण
|
तैतिल (२९:५५)
|
गाजबीज
भाद्रपद शुक्ल
द्वितीयेचे नाव. एक व्रत. उत्तरप्रदेशात पुत्रवती स्त्रिया संततीचे आयुष्य वाढावे, या उद्देशाने हे व्रत करतात. त्यासाठी भिंतीवर एक चित्र
काढतात. त्या चित्रात एका झाडाखाली एक मुलगा उभा असतो व जवळच्या एका खोपटात एक
मुलगा मरून पडलेला असतो. चित्रावर आकाशातून वीज उतरलेली असते. व्रतीनी स्त्रिया या
चित्राची पूजा करतात.
मुस्लीम जिल्हेज मासारंभ
मुस्लीम कालगणनेनुसार
जिल्हेज महिना आरंभ होत आहे.
मृत्यूयोग
१४:२७ नंतर शनिवारी हस्त
नक्षत्र असल्यामुळे मृत्यूयोग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
|
हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो.
असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने वंग प्रांतात पहिला जातो.
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने वंग प्रांतात पहिला जातो.
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष
रहात नाही.
यमघंट योग
१४:२७ नंतर शनिवारी हस्त
नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग
वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
|
सोमवार – विशाखा
|
मंगळवार – आर्द्रा
|
बुधवार – मूळ
|
गुरुवार – कृत्तिका
|
शुक्रवार – रोहिणी
|
शनिवार – हस्त
|
|
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment