Friday, 9 September 2016

दिनविशेष - १० सप्टेंबर – २०१६




तिथी
 भाद्रपद शुक्ल ९ (अहोरात्र)  
वार
 शनिवार
नक्षत्र
 जेष्ठा (६:५२)
योग
 प्रीति (१२:१६)
करण
 बालव (१८:५५)

गौरी विसर्जन

सकाळी ६:५२ नंतर मूळ नक्षत्रावर  गौरीचे नदीत विसर्जन करतात आणि परत येतांना नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.

दोरे घेणे / दोरकग्रहण

ज्येष्ठा गौरीच्या पूजेच्या वेळी दोरक ठेवून विसर्जनानंतर तो दोरक घेतला जातो. दोरक घेण्याच्या विधीस दोरकग्रहणअसे म्हणतात. दोरक म्हणजे हाताने काढलेल्या सुताचे सोळा पदरी हळदीत भिजवून रंगवलेले सूत्र होय. सोळा ही संख्या लक्ष्मीशी निगडित असल्यामुळे दोरकातही सोळा पदर असतात.

हा दोरक अत्यंत शुभकारक आणि लक्ष्मीप्राप्ती करून देणारा असतो. घरातील सर्व स्त्रिया दोरक धारण करतात. काही प्रांतांत पुरुषही आपल्या हातात हा दोरक धारण करतात. काही जण हा दोरक आपल्या धनकोशात, धान्यकोठारात, वास्तूच्या पायात आणि देवघरात ठेवतात.
गुर्वष्टमीव्रत
भाद्रपद शुक्ल अष्टमीस गुरुवार आला असता गुरूच्या सुवर्ण मूर्तीची पूजा करावी, असा या व्रताचा विधी आहे.

भागवत सप्ताहारंभ

भागवत सप्ताहाचा श्रवण विधी व दीक्षाविधी
हे कलियुगातील मोक्षदायी व्रत आहे. हे व्रत भाद्रपद शुक्ल नवमीस सुरुवात करून पौर्णिमेस संपवितात. भागवत सप्ताहाच्या कथेला भाद्रपद, आश्‍विन, कार्तिक, मार्गशीर्ष, आषाढ हे सहा महिने योग्य असून श्रोत्यांना मोक्ष देणारे आहेत. तथापी भगवद्भक्‍ताला इच्छा होताच शुभदिन पाहून सप्ताहास सुरुवात करता येते, असे शुक्राचार्यांना सांगितले आहे.

दग्धयोग

अहोरात्र शनिवारी नवमी तिथी असल्यामुळे दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment