Friday, 23 September 2016

दिनविशेष - २४ सप्टेंबर – २०१६



तिथी
 भाद्रपद कृष्ण ९ (२५:३६)   
वार
 शनिवार
नक्षत्र
 आर्द्रा (१४:४३)
योग
 वरीयान (१८:३६)
करण
 तैतिल (१४:०४)


अविधवा नवमी

भाद्रपद कृष्ण नवमीस हे नाव आहे. या दिवशी स्वत:ची माता अथवा कुटुंबातील अन्य कोणी स्त्री अहेवपणी (सधवा) मृत झाली असल्यास तिचे श्राद्ध करतात. यात ब्राह्मणभोजनाप्रमाणे सुवसिनीलाही भोजन घालण्याची रूढी आहे. या दिवशीं पिता जिवंत असुन माता मृत असेल अशा गृहस्थानें श्राध्द करावयाचें असतें. हें श्राध्द सपिंडक करावें.  माता मृत असून पुढें कांहीं दिवसांनीं पिता मृत झाल्यास हें अविधवा नवमी श्राध्द करु नये असे म्हणतात.

नवमी श्राद्ध

श्राद्धतिथी नवमी असेल तर या दिवशी महालय करावा.

घबाड

२५:३६ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: उत्तराफाल्गुनी
चंद्र नक्षत्र : पुनर्वसु
तिथी: १५ + १० = २५
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२३ x ३ = ६९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे २५ तिथी मिळवू : ६९ + २५ = ९४
आता ७ ने भागू  ९४ / ७ = १३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.


दग्धयोग

२५:३६ पर्यंत शनिवारी नवमी तिथी असल्यामुळे दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी




संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment