तिथी
|
श्रावण कृ. ४ (१०:१७)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
अश्विनी (२६:४९)
|
योग
|
वृद्धि (२२:३८)
|
करण
|
कौलव (२०:५३)
|
गोत्रव्रत
श्रावण कृष्ण चतुर्थीला
स्त्रिया हे व्रत करतात. या चतुर्थीला 'बेल चौथ' असेही म्हणतात. व्रताचा
विधी असा - एकवर्णी सवत्स धेनूची पूजा. 'तुझे सत्य माझी भक्ती' असे वाक्य गाईच्या कानात
उच्चारणे. कथाश्रवण व नंतर भोजन. या दिवशी गोरसाचा कोणताही पदार्थ खात नाहीत.
त्याचप्रमाणे सुरीने किंवा कात्रीने कापलेले कोणतेही पदार्थ खात नाहीत.
फल - पुत्रप्राप्ती व सौभाग्यवृद्धी.
मृत्यू योग
२६:४९ पर्यंत बुधवारी अश्विनी नक्षत्रामुळे होणारा मृत्यू योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या
संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये
हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
घबाड
१०:१७ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही
धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी
मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: पूर्वाभाद्रपदा
चंद्र नक्षत्र : अश्विनी
तिथी: १५+४ = १९
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १५+४ = १९ तिथी मिळवू : ५४+१९ = ७३
आता ७ ने भागू
७३ / ७ = १० ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment