तिथी
|
श्रावण कृ. ५ (७:३६), श्रावण कृ. ६
(२९:२८)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
भरणी (२५:१९)
|
योग
|
ध्रुव (१९:३६)
|
करण
|
गरज (१८:२८)
|
दग्ध योग
७:३६ पासून २९:२८ पर्यंत गुरुवारी
षष्ठी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे.
पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
यमघंट योग
२५ :१९ नंतर गुरुवारी
कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व
शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
|
सोमवार – विशाखा
|
मंगळवार – आर्द्रा
|
बुधवार – मूळ
|
गुरुवार – कृत्तिका
|
शुक्रवार – रोहिणी
|
शनिवार – हस्त
|
भद्रा
२९:२८ नंतर भद्रा म्हणजेच
विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
चंद्रषष्ठी
हे व्रत श्रावण कृष्ण
षष्ठी दिवशी करतात. यासाठी चंद्रोदयव्यापिनी तिथी धरतात. हे व्रत मुख्यत: विवाहित
अगर अविवाहित मुलीच करतात व चंद्रोदय झाल्यावर त्याला अर्घ्य देतात.
छानाछट
श्रावण कृष्ण षष्ठीला
हे व्रत पडते. हा उत्सव आहे. हे व्रत विशेषत: मारवाडी समाजात अधिक प्रिय आहे.
कुमारी मुली चांगल्या वरप्राप्तीसाठी हे व्रत करतात. काष्ठाच्या चौरंगावर कलश
स्थापन करून त्यावर सात पट्टे ओढावे आणि कापडावर स्वस्तिक काढून त्यावर गहू भरून
एक भांडे ठेवावे, नंतर हातात ७-७ गहू धरून कथा ऎकावी.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment