तिथी
|
भाद्रपद शु १० (२४:०४)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
पूर्वाषाढा (०७:१८), उत्तराषाढा
(३०:१९)
|
योग
|
शोभन (१४:२३)
|
करण
|
तैतिल (१२:५६)
|
भारतीय अश्विन मासारंभ
भारतीय कालगणनेनुसार अश्विन
मास सुरु होत आहे.
तुलायन
१३:५० ला रवि सायन तुला
राशीत प्रवेश करत आहे.
दशावतारव्रत
हे व्रत भाद्रपद
शु. दशमीला करतात. यासाठी जलाशयावर जाऊन स्नान करून देव व पितर यांचे तर्पण करावे.
नंतर आपल्या हाताचे दोन पसे कणीक घेऊन त्यापासून काही मिष्टान्न (अपूप) बनवून 'मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, राम,
कृष्ण, परशुराम, बौद्ध व कल्की या
दशावतारांचे यथाविधी पूजन करून अपूपांपैकी १० देवतांना, १० ब्राह्मणांना
व १० आपण घेऊन मग जेवावे. अशा प्रकारे दहा वर्षेपर्यंत अपूप, घीवर, कासार, मोदक, तिखटमिठाची पुरी, साखरपारे, डोवठे, गुणा, कोकर व पुष्पकर्ण या
दहापैकी दरवर्षी एक पदार्थ देवांना दहाच्या संख्येत अर्पण केल्यास विष्णुलोकाची
प्राप्ती होते.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment