तिथी
|
भाद्रपद शु ७ (२६:२४)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
जेष्ठा (अहोरात्र)
|
योग
|
प्रिती (१८:४८)
|
करण
|
गरज (१४:०७)
|
भानुसप्तमी / सूर्य सप्तमी / विवस्वत सप्तमी
रविवारी येणाऱ्या सप्तमीस भानुसप्तमी
म्हणतात. माघ महिन्यतील शुक्ल पक्षातील सप्तमीचे विशेष महत्व असते. सर्वांत प्रथम सूर्यनारायणाने मन्वन्तरापूर्वी
याच दिवशी आपला प्रकाश प्रकाशित केला.
अपराजित सप्तमी
भाद्रपद शु.
सप्तमीला अपराजिता सप्तमी असे नाव आहे. चतुर्थीला एकभुक्त राहून पंचमीला नक्त
भोजन, षष्ठीला उपवास व सप्तमीला सूर्यपूजा करून मग
पारणे, असे त्याचे विधान आहे. आश्विनादी, मार्गशीर्षादी फाल्गुनादी व ज्येष्ठादी असे या व्रताचे चार
प्रकार असून त्यांच्या देवत अनुक्रमे भर्ग, अंशुमन, अर्यमा व सविता या आहेत. या व्रतात वरील देवतांची पूजा व
प्रार्थना करायची असते. हे व्रत आचरणारा युद्धात शत्रूला पराजित करतो व
त्रिवर्गावर जय मिळवून सूर्यलोकात जातो, असे सांगितले आहे.
व्रतावधी एक वर्ष.
गौरीपूजन
भाद्रपदातील
शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन केले जाते.
गौरीची स्थापना
झाल्यानंतर दुसर्या दिवशी,
ज्येष्ठा नक्षत्रावर तिची
पूजा करून नैवेद्य दाखवतात.
अमुक्ता भरण व्रत
हे व्रत मुख्यत:
स्त्रियांसाठी आहे. या दिवशी शिव-पार्वतीच्या चित्राकृती स्थापून त्याच्या पार्श्वभागी
सोन्यारुप्याच्या तारांचा अथवा सुताचा दोरा वळून ठेवतात. नंतर षोडशोपचार पूजा
करतात. पूजेचा मंत्र असा-
मन्दारमालाकुलितलकायै
कपालमालाङ्कितशेखराय ।
दिव्याम्बरायै च
दिग्मबराय नम: शिवायै च नम: शिवाय ॥
भद्रा
२६:२४ नंतर भद्रा म्हणजेच
विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment