Monday, 14 September 2015

दिनविशेष - १५ सप्टेंबर २०१५

तिथी
 भाद्रपद शु २ (१७:२८)
वार
 मंगळवार
नक्षत्र
 हस्त (१९:३९)
योग
 शुक्ल (१६:३०)
करण
 तैतिल (--:--)

सामश्रावणी

या दिवशी सामवेदी ब्राह्मण त्यांचे जुने जानवे टाकुन नवीन जानवे धारण करतात.

गाजबीज

भाद्रपद शु. द्वितीयेचे नाव. एक व्रत. उत्तरप्रदेशात पुत्रवती स्त्रिया संततीचे आयुष्य वाढावे, या उद्देशाने हे व्रत करतात. त्यासाठी भिंतीवर एक चित्र काढतात. त्या चित्रात एका झाडाखाली एक मुलगा उभा असतो व जवळच्या एका खोपटात एक मुलगा मरून पडलेला असतो. चित्रावर आकाशातून वीज उतरलेली असते. व्रतीनी स्त्रिया या चित्राची पूजा करतात. 

मुस्लीम जिल्हेज मासारंभ


मुस्लीम कालगणनेनुसार जिल्हेज महिना आरंभ होत आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment