तिथी
|
श्रावण कृ. १० (२७:११)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
आर्द्रा (२५:३२)
|
योग
|
सिद्धि (१२:२७)
|
करण
|
वणिज (१४:५५)
|
शिवमुष्टी
जवस
श्रावणी सोमवारचे व्रत असते या दिवशी शंकराला शिवमूठ वाहिली जाते.
पहिल्या सोमवारी तांदळाची, दुसर्या सोमवारी तिळाची, तिसर्या सोमवारी मुगाची, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा असेल तर सातूची शिवमूठ वाहिली जाते.
आपल्या शेतात पिकलेलं धान्य देवाला अर्पण करण्याची वृत्ती इथं दिसून येते.
शंकराच्या १२ ज्योतीर्लिंग असलेल्या ठिकाणी भाविक मोठया संख्येने गर्दी करतात.
शिवामूठ वाहताना असे म्हणतात.
शिवा शिवा महादेवा,
माझी शिवामूठ ईश्वरा देवा.
सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा,
नावडती आहे ती आवडती कर रे देवा.
दग्ध योग
२७:११ नंतर सोमवारी एकादशी असल्यामुळे
दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
घबाड
२५:३२ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: पूर्वाफाल्गुनी
चंद्र
नक्षत्र : आर्द्रा
तिथी:
१५+१० = २५
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२३
x ३ = ६९
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १५+१० =
२५ तिथी मिळवू : ६९+२५ = ९४
आता
७ ने भागू ९४ / ७ = १३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
भद्रा
१४:५५ नंतर २७:११ पर्यंत भद्रा म्हणजेच
विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment