Friday, 4 September 2015

दिनविशेष - ५ सप्टेंबर २०१५

तिथी
 श्रावण कृ. ८ (२७:०२)
वार
 शनिवार
नक्षत्र
 रोहिणी (२४:१०)
योग
 हर्षण (१५:००)
करण
 बालव (१५:२४)

उमामहेश्‍वर व्रत

हे व्रत श्रावण कृष्ण अष्टमी दिवशी करतात. या दिवशी सायंकाळी उमामहेश्‍वराची पूजा करून एकभुक्‍त राहावे.

श्रीकृष्ण जयंती

हे व्रत श्रावण कृष्ण अष्टमीला करतात. भगवान श्रीकृष्णांचा जन्म श्रावण व. अष्टमीला बुधवारी रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री चंद्र वृषभ राशीला असताना झाला म्हणून उपासक आपल्या हितासाठी हे व्रत करतात.
हे व्रत सर्वमान्य असून बाल, कुमार, तरुण, वृद्ध सर्व लोकांना, स्त्री-पुरुषांना करण्यास योग्य आहे. यामुळे पापनाश होऊन सुखाची वाढ होते. यासाठी अष्टमीचा उपवास व नवमीचे पारणे सोडल्यावर व्रत पूर्ण होते. व्रत करणार्‍याने उपवास करण्याच्या आदल्या दिवशी अंशमात्र जेवावे. रात्री व्रतस्थ असावे. उपवासादिवशी प्रात:स्नानादी नित्यकर्मे झाल्यावर सूर्य, सोम, यम, काल, संधी, भूत, पवन, दिक्पती, भूमी, आकाश, खेचर, अमर व ब्रह्म वगैरेंना नमस्कार करून पूर्व किंवा उत्तराभिमुख बसावे, हातात पाणी, फुले, गंध, फळे घेऊन
'ममाखिल पापपरशमनपुर्वक सर्वाभीष्टसिद्धये श्रीकृष्नजन्माष्टमीव्रतमहं करिश्ये'
असा संकल्प सोडावा. मध्याह् नीला स्नान करावे. घरात देवकीसाठी 'सूतिकागृह' ठरवावे. बाळंतपणासाठी जरूर त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून ठेवाव्यात. शक्य असेल तर गाण्याबजावण्याचा कार्यक्रम ठेवावा. त्यातीलच एक सुखरूप ठिकाणी चांगला मऊ बिछाना घालून त्यावर अक्षतांनी मंडळ करून कलश स्थापावा व त्यावर सोने, चांदी, तांबा, पितळ, लाकूड अथवा माती याची मूर्ती अगर चित्र ठेवावे. चित्र वा मूर्ती जन्मलेल्या कृष्णाला स्तनपान करीत आहे व लक्ष्मी त्याच्या पायाला स्पर्श करीत आहे, असे असावे. यानंतर भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, असे मानून आपल्या संप्रदायपद्धतीने अथवा वेदोक्‍त, पुराणोक्‍त विधीने यथोपचार प्रेमाने पूजा करावी. पूजेमध्ये देवकी, वसुदेव, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा व लक्ष्मी या सर्वांचा नामनिर्देश करावा. शेवटी '
प्रणमे देवजननीं त्वया जातस्तु वामन: ।
वसुदेवात्तथा कृष्णो नमस्तुभ्यं नमो नम: ॥
सपुत्रार्घ्यं प्रदत्तं मे गृहाणेनं नमोऽस्तुते ।'
या मंत्राने देवकीला अर्घ्य द्यावेत.
'धर्माय धर्मेश्‍वराय धर्मपतये धर्मसंभवाय गोविंदाय नमो नम: '
या मंत्राने श्रीकृष्णाला पुष्पांजली अर्पण करावी.
रात्रौ कथाकीर्तन, पुराण इ. कार्यक्रमांनी जागरण करतात. देवास फराळाचा नैवेद्य दाखवतात. आणि, नवमी दिवशी पंचोपचारे पूजा करून महानैवेद्य अर्पण करतात. मृत्तिकेच्या मूर्ती असल्यास त्या जलाशयात विसर्जन करतात. धातूच्या मूर्ती असल्यास देव्हार्‍यात ठेवतात किंवा ब्राह्मणास दान देतात. काही ठिकाणी दहीकाला होतो. फल - संतती, संपत्ती वैकुंठलोक यांची प्राप्ती.

जयंतीव्रत

श्रावण कृष्ण अष्टमीला रोहिणिनक्षत्र आले असता हे व्रत करतात. यशोदा व कृष्ण ह्या व्रताच्या देवता होत. पंचपल्लवयुक्‍त कलशावर कृष्णाला स्तनपान देणार्‍या यशोदाची मूर्ती स्थापून तिच्या सन्निध चंद्र, रोहिणी यांच्याही मूर्ती बसवतात. मग त्याची पूजा करतात.

कालाष्टमी

प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
जर श्रावण कृष्ण अष्टमी दिवशी मृगशीर्ष नक्षत्र असेल तर शिवपूजन करून हे व्रत करावे.

मन्वादि

१४ मन्वंतराच्या आरंभ झाल्या अशा १४ तिथीन मन्वादी असे म्हणतात. या मन्वादी १४ तिथी पुढे दिल्या आहेत.

१)      चैत्र – शु. ३,
२)      चैत्र - पौर्णिमा
३)      जेष्ठ – पौर्णिमा
४)      आषाढ – शु १०,
५)      आषाढ - पौर्णिमा
६)      श्रावण – कृ ८
७)      भाद्रपद – शु ३
८)      अश्विन – शु. ९
९)      कार्तिक शु १२,
१०)  कार्तिक - पौर्णिमा
११)  पौष – शु ११
१२)  माघ – शु ७
१३)  फाल्गुन – पौर्णिमा,
१४)  फाल्गुन –अमावास्या

दग्ध योग

२७:०२ नंतर शनिवारी नवमी तिथी असल्यामुळे दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


अमृत योग

२४:१० पर्यंत प्रयाणास वर्ज असा शनिवारी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे अमृतसिद्धी योग होतो. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

शिक्षक दिन

डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन (५ सप्टेंबर) म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते. राष्ट्रउभारणीच्या कार्यात शिक्षकाचा मोठा वाटा असतो. डॉ. राधाकृष्णन यांनी एके  ठिकाणी म्हटले आहे - "ज्या देशात निस्वार्थी निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते तेंव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानाला पात्र होतात." आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी शिक्षकांचा सन्मान केला जातो.

विश्वातील विविध देशांमध्ये विविध दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. ५ ऑक्टोंबर हा जागतिक शिक्षक दिन आहे.

देश
शिक्षक दिन
अर्जेन्टीना
११ सप्टेंबर
अल्बानिया
७ मार्च
ऑस्ट्रेलिया
ऑक्टोंबर मधील शेवटचा शुक्रवार
ब्राज़ील
१५ ऑक्टोंबर
चिली
१६ ऑक्टोंबर
चीन(PRC)
१० सप्टेंबर
चेक गणराज्य
२८ मार्च
इक्वाडोर
१३ एप्रिल
अल साल्वाडोर
२२ जून
हांग कांग
१२ सप्टेंबर
हंगरी
जून महिन्याचा पहिला दिवस
भारत
५ सप्टेंबर
इंडोनेशिया
२५ नोव्हेंबर
ईरान
२ मे
मलेशिया
१६ मे
मेक्सिको
१५ मे
मंगोलिया
फेब्रुवारीचा पहिला weekend
पाकिस्तान
५ ऑक्टोंबर
पेरू
६ जुलै
फ़िलीपीन्स
५ ऑक्टोंबर
पोलैंड
१४ ऑक्टोंबर
रूस
५ ऑक्टोंबर
सिंगापुर
१ सप्टेंबर
दक्षिण कोरिया
१५ मे
ताइवान
२८ सप्टेंबर
थाईलैंड
१६ जानेवारी
तुर्की
२४ नोव्हेंबर
संयुक्त राज्य अमेरिका
६ मे
वियतनाम
२० नोव्हेंबर

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment