तिथी
|
श्रावण कृ. ११ (२८:०८)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
पुनर्वसु (२७:०४)
|
योग
|
व्यतिपात (११:५४)
|
करण
|
बव (१५:३५)
|
अजा एकादशी / कृष्णैकादशी
हे सुप्रसिद्ध व्रत श्रावण
कृष्ण एकादशी दिवशी करतात. हिचे 'अजा एकादशी' असे एक नाव आहे. या व्रताने
पापाचा नाश होऊन पुनर्जन्मापासून मनुष्य मुक्त होतो. प्राचीन काळी राजा हरिश्चंद्राने
ही एकादशी केल्याची व त्यामुळे त्याची पूर्वस्थिती परत आल्याची कथा आहे.
घबाड
२७:०४ नंतर २८:०८ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: पूर्वा फाल्गुनी
चंद्र
नक्षत्र : पुष्य
तिथी:
१५+११ = २६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २५
२५
x ३ = ७५
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १५+११ =
२६ तिथी मिळवू : ७५+२६ = १०१
आता
७ ने भागू १०१ / ७ = १४ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
गुरु दर्शन
१३ ऑगस्टला अस्तंगत
झालेल्या गुरुचे दर्शन पूर्वेकडे होऊ शकेल.
ग्रहांचे
सूर्य सानिध्यामुळे अदर्शन होते. यालाच ‘अस्त’ असे म्हणतात. आणि तोच ग्रह
सूर्यापासून ठराविक अंतारावर गेला कि त्याचे दर्शन आपल्याला पूर्वेस अथवा पश्चिमेस
होऊ लागते. त्याला ‘उदय’ असे म्हणतात.
सूर्यापासून
प्रत्येक ग्रह जितक्या अंशावर असता आपल्याला त्याचे दर्शन होऊ शकते म्हणजेच
ग्रहाचा उदय होतो, त्याला त्या ग्रहाचे ‘कालांश’ असे संबोधतात.
गुरुचे कालांश ११ अंश आहेत.
गुरु
हा आकाराने मोठा असा शुभ ग्रह आहे.
गुरु शुभग्रह असल्यामुळे तो
अस्तंगत असताना अनेक शुभ कार्यांना वर्ज असतो.
अस्त होण्यापूर्वी काही
दिवस त्याच्या तेजाच्या वार्धक्याचे व उदयानंतर काही दिवस तेजाच्या बालात्वाचे
म्हणूनही धर्म कार्यात वर्ज सांगितले आहेत.
बालत्व / वृद्धत्व
|
दिशा
|
दिवस
|
बालत्व
|
पूर्वेस उदय
|
१५ / १० / ७ / ५ / ३ दिवस
|
बालत्व
|
पश्चिमेस उदय
|
१५ / १० / ७
|
वृद्धत्व
|
पूर्वेस अस्त
|
१५ / १० / ७
|
वृद्धत्व
|
पश्चिमेस अस्त
|
१५ / १०/ ७ / ५
|
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment