तिथी
|
भाद्रपद शु १३ (१५:४३)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
शततारका (२३:४७)
|
योग
|
शूल (२४:५३)
|
करण
|
गरज (२५:५७)
|
गिरिराज व्रत आणि पूजन
भाद्रपद शु.
त्रयोदशीला हे व्रत करतात. या व्रतात गोवर्धन पर्वताची पूजा सांगितली आहे. या
व्रताचे फल राजसूय व अश्वमेध यज्ञाच्या फलासमान आहे.
दुर्गात्रिरात्र व्रत
हे स्त्रीव्रत
आहे. भाद्रपद शु. त्रयोदशीला प्रारंभ करून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावयाचे असते.
याचा विधी असा- तीन दिवस उपवास करावा. उमामहेश्वर, धर्म आणि
सावित्री यांच्या मूर्ती दुर्वांमध्ये ठेवून त्यांची पूजा करावी. रात्रौ जागरण
करावे. अखेरच्या दिवशी होम करून व्रताची समाप्ती करावी.
फल - धन, पुत्र व सौख्य यांचा लाभ.
घबाड
१५:४३ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: उत्तरा फाल्गुनी
चंद्र
नक्षत्र : शततारका
तिथी:
१३
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १३
१३
x ३ = ३९
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १३ तिथी
मिळवू : ३९+१३ = ५२
आता
७ ने भागू ५२ / ७ = ७ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment