Thursday, 3 September 2015

दिनविशेष - ४ सप्टेंबर २०१५

तिथी
 श्रावण कृ. ७ (२७:५६)
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 कृत्तिका (२४:२५)
योग
 व्याघात (१७:०३)
करण
 विष्टी (१६:३७)

दग्धयोग

२७:५६ नंतर शुक्रवारी अष्टमी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


यमघंट योग

२४:२५ नंतर शुक्रवारी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


भद्रा

१६:३७ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

पुत्रव्रत

या व्रतासाठी श्रावण कृष्ण सप्तमीला उपवास करून विष्णूचे पूजन करावे. दुसरे दिवशी
'ॐ क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा'
या मंत्राने तिळाच्या १०८ आहुती द्याव्यात. ब्राह्मणभोजन घालून बेलफळ खाऊन वर षड्‌रस (मधुर, आंबट, खारट, कषाय, तिक्‍त, कटू ) अन्न घ्यावे. याप्रकारे प्रत्येक सप्तमीला करून वर्षभर झाल्यावर दोन गोदाने दिल्यास पुत्रप्राप्ती होते.

ललितासखी व्रत


श्रावण कृष्ण सप्तमीला हे व्रत करतात. सकाळी स्नानानंतर शुभ्र वस्त्रे नेसून नदीजवळून माती आणून त्याचे लिंग करावे व त्याची यथासांग पूजा करावी. नैवेद्य दाखवून आरती करावी. रात्री देवीच्यासाठी जागरण करावे व सकाळी सर्व वस्तू नदीकाठी नेऊन पुन्हा पूजा करून ब्राह्मण स्त्रियांना दान द्याव्यात व पूजा विसर्जन करावी. नंतर हवन, देव-पितर यांचे पूजन करून ब्राह्मणभोजन घालून दक्षिणा द्यावी. यायोगे सर्व मनोकामना पूर्ण होऊन शिवलोक प्राप्त होतो.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment